Home धार्मिक मंदिरांचा महाकुंभ’ – आयटीसीएक्स २०२५’ मध्ये आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि गोव्याचे मुख्यमंत्री एकाच मंचावर

मंदिरांचा महाकुंभ’ – आयटीसीएक्स २०२५’ मध्ये आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि गोव्याचे मुख्यमंत्री एकाच मंचावर

31 second read
0
0
40

no images were found

मंदिरांचा महाकुंभ’ – आयटीसीएक्स २०२५’ मध्ये आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि गोव्याचे मुख्यमंत्री एकाच मंचावर

 

● जगातील सर्वात मोठे मंदिर संमेलन ‘आयटीसीएक्स २०२५’ चे तिरुपतीत भव्य समारंभासह उदघाटन

● महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सदर प्रतिष्ठित सभेला केले संबोधित

● पंतप्रधान मोदींनी या उत्सवाला ‘वसुधैव कुटुम्बकम’ म्हणत विशेष संदेशातून केले कौतुक

 

 

तिरुपती,: तिरुपती येथील आशा कन्वेन्शन सेंटरमध्ये १७ फेब्रुवारीला संपन्न झालेल्या ”आंतरराष्ट्रीय मंदिर संमेलन आणि प्रदर्शनी २०२५ अर्थात आयटीसीएक्स २०२५” च्या उद्घाटन समारंभात भारतातील मंदिरांचा वारसा पुनरुज्जीवित करण्याच्या मोहिमेवर असलेले प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वे, प्रसार माध्यमे, भक्तमंडळी आणि भागीदार एकत्र आले होते.

 हे तीन दिवसीय कार्यक्रम आयटीसीएक्सचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र विधानपरिषदेचे मुख्य प्रतोद श्री प्रसाद लाड, आयटीसीएक्स आणि टेम्पल कनेक्टचे संस्थापक श्री गिरीश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केले गेले होते आणि अंत्योदय प्रतिष्ठानच्या सहकार्याने पार पडले.

        नाद ढोल ताशा पथकाच्या वादनाने झाली. रंगीबेरंगी पोशाखातील तरुण मुला मुलींनी केलेल्या गगनभेदी वादनाने  सभागृहात सकारात्मकता पसरली. ‘श्री हरि गोविंद’ ह्या मंत्राचा आवाज आसमंतात घुमला. या वादनाने महाराष्ट्राच्या पुरातन परंपरांना उजाळा प्राप्त झाला.

        जगातील सर्वात मोठ्या मंदिर उत्सवाची सुरुवात पुजारी महाराजांनी गणेश स्थापना, आशीर्वचन व गणपती अथर्वशीर्षं पठणाने केली, ज्यामुळे सभागृहात एक आध्यात्मिक ऊर्जा भरली. मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून ईश्वर आणि पुजारी महाराज यांचे आशीर्वाद घेतले.

       दीपप्रज्वलनाने सोहळ्याची सुरुवात होताच, कार्यक्रमाच्या आध्यात्मिक महत्त्वाला उद्देशून देशाच्या सर्वोच्च कार्यालयाकडून एक विशेष पत्र प्राप्त झाले. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आयटीसीएक्स २०२५- मंदिरांचा महाकुंभ’ विषयी त्यांच्या मनमंदिरातून  कृतज्ञता व्यक्त केली. पत्रात त्यांनी असे म्हटले की, आयटीसीएक्स २०२५ हा एक अद्वितीय उपक्रम आहे, जो हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख धर्मांसारख्या विविध पार्श्वभूमीतील हजारो मंदिरांचे विश्वस्त, प्रशासक आणि संबंधित व्यक्तींना एकत्र आणतो, ज्यामुळे नवीन शिकवण मिळते, उत्तम पद्धती अंगीकारणे आणि मंदिर व्यवस्थापनातील प्रमुख आव्हानांवर काम करणे शक्य होते.

आपल्या भाषणात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हिंदू राजांनी सनातन धर्मासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानावर प्रकाश टाकला. यावर अधिक स्पष्टवक्तेपणे बोलत त्यांनी सांगितले की, परकीय शक्ती म्हणजेच मुघल, पोर्तुगीज, आणि डच भारतावर राज्य करत असताना देखील, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मंदिरांची पुनर्स्थापना करण्यासाठी अतोनात काम केले. त्यांच्यामुळेच आज आपल्याला तिरुपतीमध्ये हा ‘मंदिरांचा महामेळा’ चे आयोजित करण्याचे आणि उत्तर भारतात महाकुंभ मेळा आयोजित करण्याचे भाग्य लाभले. “प्रत्येक राज्याची भाषा आणि संस्कृती वेगळी असली तरी, आपण सर्वजण मंदिरांच्या माध्यमातून एकत्र जोडले गेले आहेत,” असे त्यांनी सांगितले.

       राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूज्य सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, यांनीही टेम्पल कनेक्ट कडून मंदिरांचा एकत्रित करण्यासाठी आयटीसीएक्स 2025 च्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करणारा एक आभासी संदेश दिला, ज्यात २०२३ मध्ये पहिल्या आवृत्तीच्या यशस्वीतेनंतर त्याच्या असामान्य प्रगतीवर त्यांनी भर दिला. त्यांनी सांगितले, “पूर्वीच्या काळात मंदिरे भारतीय समाजाचची सांस्कृतिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, आर्थिक आणि सामाजिक केंद्रे होती. आजही, सनातन परंपरा पाळणाऱ्यांमध्ये सर्वांमध्ये मंदिरांबद्दल एक अमाप श्रद्धा आहे आणि हे वेळोवेळी अनेक उदाहरणांनी सिद्ध झाले आहे. ही श्रद्धाच आजही अनेक ठिकाणी मंदिरे सांस्कृतिक केंद्र म्हणून कार्यरत राहण्यासाठी कारणीभूत आहे.”

       महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मुख्य पाहुणे देवेंद्र फडणवीस यांनी आयटीसीएक्स २०२५ चे  महत्व अधोरेखित करीत कौतुक करताना म्हटले, “मी टेम्पल  कनेक्ट उपक्रमामागील टीमचे अभिनंदन करू इच्छितो, जी मंदिरांना अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मदत करत आहे, कारण एका अभ्यासानुसार असे समोर आले आहे कि ५५ टक्के नागरिक आध्यात्मिक पर्यटनाची निवड करत आहेत.” संमेलन अहिल्या बाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीच्या औचित्यावर पार पडत असल्याबद्दल त्यांना विशेष कौतुक वाटले.“उत्स्फूर्त प्रतिसाद, मान्यवरांचा सहभाग, आणि अंतर्दृष्टीने परिपूर्ण चर्चांनी या संमेलनाची आवश्यकता पुन्हा एकदा सिद्ध केली,” असे आयटीसीएक्स २०२५

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…