no images were found
जलजन्य व किटकजन्य आजार टाळण्यासाठी नागरिकांसाठी जाहीर आवाहन
कोल्हापूर : महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाणीसाठा कमी झाल्याने नागरीकांना गढुळ व दुषित पाणी पुरवठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच मागील आठवड्यामध्ये टायफॉईड सदृष्य जलजन्य आजाराच्या रुग्णांच्या संख्येमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसुन आले आहे. कमी पाणी पुरवठ्यामुळे पाणी साठवुन ठेवल्यामुळे किटकजन्य आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी कावीळ, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसीस, डीसेंट्री, डायरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया व मलेरिया इत्यादी आजारापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात यामध्ये पाणी उकळून, गाळून व थंड झाल्यावर प्यावे. उघड्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नये. शिळे अन्न खावू नये. जेवणापूर्वी तसेच शौचानंतर हात साबण व पाण्याने स्वच्छ धुवावे. उघड्यावर शौचास बसू नये. आपल्या घरामध्ये व घरच्या आजुबाजूस सांडपाणी व कचरा साचून राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी. घरामध्ये वापरासाठी भरुन ठेवलेले पाण्याचे कंटेनर नीट झाकून ठेवण्यात यावेत, साठवून ठेवलेल्या पाण्याचे कंटेनर व भांडी आठवडयातून एक वेळा कोरडी करुन घासून-पुसून स्वच्छ ठेवावीत. डासांपासुन संरक्षणासाठी लांब हाताचे व पाय घोळ कपडे वापरावेत. नारळाच्या करवंटया, टायर, यांची वेळीच विल्हेवाट लावावी व फ्रिजच्या मागील जाळया स्वच्छ ठेवाव्यात, झाडांच्या कुंडयामध्ये पाणी साचु देऊ नये. तापाच्या रुग्णांनी जवळच्या सरकारी अथवा खाजगी रुग्णालयांमध्ये त्वरित जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य औषधोपचार घ्यावा. आपल्या भागामध्ये संशयीत तापाच्या रुग्णांचे रक्त नमुने घेण्यासाठी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. हिवतापाच्या रुग्णांची रक्ततपासणी महापालिकेच्या रुग्णालयात व डेंगी संशयीत रुग्णांची तपासणी छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालयात होत असल्यामुळे नागरिकांना त्याचा लाभ घ्यावा. तापाच्या रुग्णांनी जवळच्या सरकारी अथवा खाजगी रुग्णालयांमध्ये त्वरित जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य औषधोपचार घ्यावा. घरामध्ये औषध फवारणीसाठी आलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. डेंग्यू डास अळ्या या स्वच्छ,साचलेल्या किंवा साठलेल्या पाण्यात आढळून येतात. त्यामुळे आठ दिवसातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. डेंग्यू, चिकनगुनिया व झिका या आजाराचे डास दिवसा चावतो त्यामुळे दिवसासुध्दा काळजी घ्यावी.
तरी शहरातील नागरीकांनी काळजी घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.