no images were found
विशाळगडावर मुस्लीम सरदार रेहान मलिकच्या नावाने भरवला जाणार्या उरुसाला अनुमती नाकारा ! – हिंदू एकता आंदोलनाची निदर्शनाद्वारे मागणी
कोल्हापूर(प्रतिनिधी ):- यापूर्वी विशाळागडावर रेहान मलीक यांच्या नावावर जो उरूस भरवला जात आहे त्या उरूसामध्ये मोठ्या प्रमाणात प्राण्यांचा बळी दिल्याने त्याचे मांस आणि रक्त सर्वत्र सांडून विशाळगड अपवित्र होत असे. सद्यस्थितीत सरकारने विशाळगडावर प्राणहत्या आणि मद्यप्राशन करण्यासाठी बंदी घातली आहे. १४ मे या दिवशी प्रशासनाने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यास अनुमती नाकारली आहे. त्यामुळे २८ ते ३० मे या कालावधीत रेहान मलिक यांच्या नावाने होणार्या उरुसाला अनुमती नाकारून तेथील सर्व अवैध अतिक्रमणे जमिनदोस्त करावीत, अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी केले. ते याच मागणीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर झालेल्या निदर्शनाप्रसंगी बोलत होते.
निदर्शने झाल्यावर निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी हिंदू एकता आंदोलनाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, हिंदू विधीज्ञ परिषदेचे श्री. बाबासाहेब भोपळे, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. रामभाऊ मेथे आणि श्री. नितीन काकडे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे यांसह मोठ्या संख्येने हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.