no images were found
२५ लाख रूपयांपर्यंतच्या विमा रकमेच्या पर्यायांसह व्हॅल्यू प्लस सादर
स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या भारतातील अग्रणी स्वतंत्र आरोग्य विमा कंपनीने आज टियर २-३-४ शहरांमधील तरुण भारतीयांना वाढीव आरोग्य संरक्षण देण्यासाठी एका परवडणाऱ्या विमा सुविधेची घोषणा केली.व्हॅल्यू प्लस नावाच्या या प्लॅनमध्ये निवडक रुग्णालय नेटवर्कच्या माध्यमातून ७.५ लाख रूपये ते २५ लाख रूपयांपर्यंतचे उच्च विमा संरक्षण जवळपास २० टक्के कमी प्रीमियममध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.गोव्यात स्टार हेल्थचे १५०० हून अधिक एजंट्सचे मजबूत वितरण नेटवर्क आहे. याव्यतिरिक्त, कंपनीने राज्यात ४१,०००हून अधिक लोकांना विमा संरक्षण दिले असून, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये १५.९कोटीं रुपयांचे २४०० हून अधिक क्लेम्स सेटल (दावे मंजूर) केले आहेत.
या लाँचबाबत मत व्यक्त करत स्टार हेल्थ इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ आनंद रॉय म्हणाले, “गेल्या २० वर्षांत, स्टार हेल्थ इन्शुरन्सने लाखो भारतीयांसाठी आरोग्य विमा अधिक विश्वासार्ह, सुलभ आणि परवडणारा बनवण्यासाठी कार्य केले आहे.गोव्यामध्ये व्हॅल्यू प्लसच्या माध्यमातून आम्ही टियर २, ३ आणि ४ मधील भारतातील अधिकाधिक व्यक्ती आणि कुटुंबांच्या आवाक्यात दर्जेदार आरोग्य विमा आणून हाच वारसा पुढे चालवत आहोत. गोवा आमच्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि उच्च विमा रकमेचे पर्याय, रुग्णालयांचे निवडक नेटवर्क आणि वेलनेस-आधारित फायदे यांचा मेळ घालत जवळपास २० टक्के कमी प्रीमियममध्ये सेवा देऊन व्हॅल्यू प्लस व्यापक ग्राहक वर्गासाठी विशेष नियोजित परवडणारा पर्याय उपलब्ध करून देतो. हे लाँच म्हणजे आरोग्य संरक्षणाचे लोकशाहीकरण करण्याच्या आमच्या ध्येयाचे सातत्य असून सर्वांसाठी विमा हे राष्ट्रीय ध्येय पुढे नेण्याच्या दिशेने टाकलेले एक व्यावहारिक पाऊल आहे.”
याबाबत आपले मत व्यक्त करत स्टार हेल्थ इन्शुरन्स गोवा विभागाचे बिझनेस हेड धीरज गोयल म्हणाले,”व्हॅल्यू प्लस हे आजच्या ग्राहकांसाठी आरोग्य विमा अधिक प्रासंगिक, परवडणारा आणि सुलभ बनवण्यावरील आमच्या लक्ष्याला अधोरेखित करते. उच्च विमाकृत राशी पर्याय, अत्यावश्यक आरोग्य सेवांचे फायदे, वेल्नेस सपोर्ट आणि प्रीमियममधील कार्यक्षमता एकत्र आणून हे उत्पादन कुटुंबांना वाढत्या वैद्यकीय गरजांचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यास मदत करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. राज्यातील आमचे व्यापक वितरण नेटवर्क आणि निवडक रुग्णालयांपर्यंतच्या सुलभ प्रवेशासह, अधिकाधिक कुटुंबांना संपूर्ण आत्मविश्वासाने अर्थपूर्ण आरोग्य संरक्षण निवडण्यास सक्षम करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”