Home शासकीय     इचलकरंजी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या सुविधा द्या -विकास खारगे 

    इचलकरंजी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या सुविधा द्या -विकास खारगे 

20 second read
0
0
57

no images were found

    इचलकरंजी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या सुविधा द्या -विकास खारगे 

कोल्हापूर : इचलकरंजी महापालिका अंतर्गत सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात शाळा सुरु होण्यापूर्वी  गणवेश व शालेय साहित्य वाटप करावे. तसेच त्यांना उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना प्रधान सचिव विकास खारगे यांनी दिल्या.

      इचलकरंजी महानगर पालिका प्रशासन व आम्ही इचलकरंजीकर अधिकारी  ग्रुप यांची समन्वय बैठक मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतच संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.       

      यावेळी खारगे पुढे म्हणाले की, इचलकरंजी महापालिकेने महापालिकेच्या अंतर्गत सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना  शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये सर्व शालेय सोयीसुविधा उपलब्ध करून दद्याव्यात. एक ही विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांना अद्यावत तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात. 

      यावेळी  प्रांत अधिकारी विकास खरात, तहसीलदार कल्पना ढवळे, आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख,  प्र.उपायुक्त केतन गुजर, कामगार अधिकारी विजय राजापुरे, कार्यकारी अभियंता संजय बागडे, कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.सुनिलदत्त संगेवार, नगर रचनाकार रणजित कोरे, विद्युत अभियंता संदीप जाधव, प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासक अधिकारी  नम्रता गुरसाळे, आम्ही इचलकरंजीकर अधिकारी ग्रुपचे अध्यक्ष उल्हास पुजारी, विनायक जाधव, सोमनाथ रसाळ, इम्रान नाईकवडे, निखिल दोपरे उपस्थित होते.

 
 
 
 
 
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…