Home शासकीय इचलकरंजीसाठी सुसज्ज क्रीडा संकुलाचा प्रस्ताव पाठवावा : विकास खारगे 

इचलकरंजीसाठी सुसज्ज क्रीडा संकुलाचा प्रस्ताव पाठवावा : विकास खारगे 

31 second read
0
0
44

no images were found

इचलकरंजीसाठी सुसज्ज क्रीडा संकुलाचा प्रस्ताव पाठवावा : विकास खारगे 

 

कोल्हापूर : इचलकरंजी शहरातून राज्य, राष्ट्र व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत यासाठी सर्व सोयी सुविधानी परिपूर्ण असे क्रीडा संकुल असावे याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. असे निर्देश प्रधान सचिव विकास खारगे यांनी दिले.

      इचलकरंजी महानगरपालिकेचे काही विकासात्मक प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी प्रलंबित असतील तर त्याबाबतची सविस्तर माहिती द्यावी. सर्व प्रस्ताव त्वरित मंजूर होण्यासाठी प्रयत्न करून इचलकरंजी महापालिकेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत असे सूचना खारगे यांनी इचलकरंजी महापालिका प्रशासन व आम्ही इचलकरंजी ग्रुपच्या सदस्यांना दिल्या.

    तसेच संपूर्ण इचलकरंजी शहर ‘हरित शहर’ होण्यासाठी महापालिकेसह सर्व नागरिकांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना खारगे यांनी करून शहराचा वृक्ष नियोजन आराखडा सादर करण्याचे निर्देशित केले. घनकचरा व्यवस्थापन करून शहर पूर्णपणे स्वच्छ राहील याबाबत दक्षता घ्यावी असेही त्यांनी सुचित केले.

     यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव  खारगे यांनी इचलकरंजी महापालिकेच्या विविध प्रलंबित प्रश्नांची माहिती घेतली. तसेच विविध विकासात्मक कामांना गती देण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या. आम्ही इचलकरंजी ग्रुपने ही इचलकरंजी महापालिका प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन  खारगे यांनी केले.

      यावेळी शहराच्या पुढील विषयांवर विविध क्षेत्रातील विकासाकरिता नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच शाहू हायस्कूल आणि विद्या निकेतन शाळेत आवश्यक सुविधांबाबत महापालिकेच्या अंदाजपत्रकात तरतुदी करण्यात आल्या असून आधुनिक पद्धतीचे बेंच डिजिटल बोर्ड शासनाकडून मिळाण्याची मागणी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केली.

    शहरातील गरजू, गरीब विद्यार्थ्यांना नियमित व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता यावा याकरिता  रविंद्रनाथ टागोर वाचनालयाच्या सध्याच्या इमारतीवर दुसऱ्या मजल्याच्या बांधकामाची मागणी इचलकरंजीकर ग्रुपच्या सदस्यांनी केली. यावर शासनाकडे मागणी करण्यात येईल, असे आयुक्त श्री. देशमुख यांनी सांगितले.

       आम्ही इचलकरंजीकर अधिकारी ग्रुपच्यावतीने सोमनाथ रसाळ यांनी शहरातील विकासाकरिता राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांकरिता सर्व सामाजिक व  स्वयंसेवी संस्थांचे  सहकार्य घेण्याकरिता एक बैठक आयोजित करण्याची विनंती केली, यावर लवकरच अशी बैठक घेण्याचे नियोजन करु, असे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले.

     संघटनेचे अध्यक्ष उल्हास पुजारी यांनी  प्रास्ताविक केले. त्यानंतर आयुक्त सुधाकर देशमुख यांनी मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे यांचे महापालिकेच्या वतीने  स्वागत केले.

 
 
 
 
 
 
 
 
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…