Home विमा आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफतर्फे अल्पकालीन आर्थिक जबाबदाऱ्यांसाठी खास तयार केलेला 10 वर्षांचा जीवन विमा संरक्षण प्रस्ताव सादर

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफतर्फे अल्पकालीन आर्थिक जबाबदाऱ्यांसाठी खास तयार केलेला 10 वर्षांचा जीवन विमा संरक्षण प्रस्ताव सादर

27 second read
0
0
10

no images were found

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफतर्फे अल्पकालीन आर्थिक जबाबदाऱ्यांसाठी खास तयार केलेला 10 वर्षांचा जीवन विमा संरक्षण प्रस्ताव सादर

मुंबई,: आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सने गृहकर्जव्यवसाय कर्ज आणि मुलांच्या शिक्षणासारख्या निश्चित आर्थिक जबाबदाऱ्या असलेल्या ग्राहकांसाठी आयसीआयसीआय प्रु आयप्रोटेक्ट स्मार्ट प्लस अंतर्गत 10 वर्षांचे जीवन विमा संरक्षण सादर केले आहे. सर्वसाधारणपणे जेव्हा आर्थिक जबाबदाऱ्या आणि उत्पन्नावरील अवलंबित्व सर्वाधिक असते अशा कालावधीत हे उत्पादन जीवन विमा संरक्षण पुरविते.

      अनेक व्यक्तींसाठी मोठी आर्थिक जबाबदारी स्वीकारल्यानंतरचे पहिले दशक हे वाढलेल्या आर्थिक जबाबदाऱ्यांचे असते. निश्चित कालावधीसाठी व्यवसाय कर्ज घेतलेल्या स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तीगृहकर्जधारक तसेच आपल्या मुलांच्या शिक्षणाचे नियोजन करणाऱ्या पालकांसाठी ही संकल्पना विशेषतः उपयुक्त आहे. 10 वर्षांचे जीवन विमा संरक्षण हे जीवनातील महत्त्वाचा आर्थिक टप्पा लक्षात घेऊन तयार करण्यात आले असून परवडणाऱ्या खर्चात जीवन विमा संरक्षण सुविधा उपलब्ध करून देते.

     या सादरीकरणाबाबत बोलताना आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सचे मुख्य उत्पादन अधिकारी श्री. विकास गुप्ता म्हणाले, “घर खरेदी करणेव्यवसाय उभारणे किंवा मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक नियोजन करणे यांसारखी अनेक आर्थिक उद्दिष्टे निश्चित कालावधीशी संबंधित असतात. आयसीआयसीआय प्रु आयप्रोटेक्ट स्मार्ट प्लसची रचना या महत्त्वाच्या कालावधीत संरक्षण पुरविण्यासाठी करण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या आर्थिक जबाबदाऱ्यांचे संरक्षण करताना त्यांच्या प्रियजनांचे आर्थिक भविष्यही सुरक्षित ठेवण्यास मदत होते. यातून जीवनाच्या विविध टप्प्यांवर ग्राहकांच्या बदलत्या गरजांनुसार संरक्षणात्मक उपाय उपलब्ध करून देण्यावर असलेला आमचा भर दिसून येतो. यामुळे भारतातील विमा प्रसाराला चालना मिळण्यास तसेच ‘2047 पर्यंत सर्वांसाठी विमा’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योगदान मिळण्यास मदत होईल.”

    या योजनेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण 10 वर्षांच्या पॉलिसी कालावधीत जीवन विमा संरक्षणाची रक्कम स्थिर राहते. त्यामुळे कुटुंबांना संपूर्ण जीवन विमा संरक्षणाची रक्कम उपलब्ध राहते. त्यायोगे केवळ कर्जाशी संबंधित आर्थिक जबाबदाऱ्याच नव्हे तर इतर व्यापक आर्थिक गरजा आणि भविष्यातील उद्दिष्टे पूर्ण करण्यासही मदत होते.

     या प्रस्तावाद्वारे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स आपल्या संरक्षणविषयक उत्पादनांच्या पोर्टफोलिओला अधिक बळकट करत असूनव्यक्ती आणि कुटुंबांना अधिक आर्थिक सक्षमता निर्माण करण्यास मदत करणारे उपाय उपलब्ध करून देत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In विमा
Comments are closed.

Check Also

नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेस उत्साहात प्रारंभ

नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेस उत्साहात प्रारंभ कोल्हापूर,  : क…