Home Uncategorized जेन झी आणि भारत अन्न व्यापाराची पुनर्व्याख्या करत असल्याने फ्लिपकार्टच्या अन्न आणि पोषण क्षेत्रात ५०% वाढ

जेन झी आणि भारत अन्न व्यापाराची पुनर्व्याख्या करत असल्याने फ्लिपकार्टच्या अन्न आणि पोषण क्षेत्रात ५०% वाढ

1 min read
0
0
42

no images were found

जेन झी आणि भारत अन्न व्यापाराची पुनर्व्याख्या करत असल्याने फ्लिपकार्टच्या अन्न आणि पोषण क्षेत्रात ५०% वाढ

  • जेन झी आणि भारत भारताच्या खाद्यसंस्कृतीला नव्याने आकार देत असल्याने पोषक, उच्च दर्जाच्या आणि नवनवीन शोधांवर आधारित खाद्यपदार्थांच्या वापराची मागणी वाढत आहे.
  • फ्लिपकार्ट मिनिट्सचा या श्रेणीतील मागणीत २५% वाटा आहे, तर टियर २+ बाजारपेठांचा एकूण मागणीत ६५% वाटा आहे. त्यातून संपूर्ण भारतात आधुनिक खाद्यपदार्थांच्या निवडीचा वाढता स्वीकार अधोरेखित होतो.
  • फूड फेस्ट ३.० ने खाद्य व्यापाराचे भविष्य प्रदर्शित करण्यासाठी ५० हून अधिक आघाडीचे ब्रँड्स, १००० हून अधिक क्रिएटर्स, प्रसिद्ध शेफ आणि कलाकारांना एकत्र आणले.

कोल्हापूर – : भारतातील स्वदेशी ई-वाणिज्य बाजारपेठ असलेल्या फ्लिपकार्टने आज आपल्या फूड आणि न्यूट्रिशन (अन्न आणि पोषण) श्रेणीमध्ये वार्षिक ५०% वाढ झाल्याची घोषणा केली. या वाढीमागे जेन झी ग्राहक आणि धुळे, इम्फाळ, धारवाड, उज्जैन, हुबळी, मिरगंज आणि लहरपूर अशा टियर २+ बाजारपेठांमधील खरेदीदार हे सर्वात मोठे चालक म्हणून उदयास आले आहेत. जलद वाणिज्यने यात महत्त्वाचे योगदान दिले असून फ्लिपकार्ट मिनिट्सने एकूण मागणीत २५% वाटा उचलला आहे. रेसिपी, क्रिएटर्सच्या शिफारसी आणि वेलनेस ट्रेंड्सच्या माध्यमातून नवीन खाद्यपदार्थ शोधणारे तरुण ग्राहक तसेच अधिकाधिक आरोग्यदायी स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तू आणि आधुनिक पोषण उत्पादने स्वीकारणारे महानगराबाहेरील खरेदीदार या गतीला चालना देत आहेत. ही वाढ फ्लिपकार्ट फूड फेस्ट २०२६ च्या तिसऱ्या आवृत्तीत दिसून आली, त्यात ५० हून अधिक आघाडीचे ब्रँड्स आणि फराह खान, शेफ कुणाल कपूर आणि शेफ रणवीर ब्रार यांच्यासह १००० हून अधिक क्रिएटर्स आणि सेलिब्रिटी शेफ एकत्र आले होते.

भारतातील ग्राहकांच्या बदलत्या गरजा: आरोग्याला प्राधान्य देणाऱ्या जीवनशैलीकडे होणारा बदल उलगडणे

जेन झीचच्या मागणीत वार्षिक ६०% वाढ झाली असून प्रोटीन ओट्स, हाय प्रोटीन पीनट बटर, गॉरमेट चॉकलेट्स आणि प्रोटीन मुसली अशा श्रेणी मागणीत आघाडीवर आहेत. बंगळुरू आणि नवी दिल्लीसारख्या शहरी केंद्रांमधील मागणीमुळे कप नूडल्स आणि चिप्ससारखे कोरियन-फ्लेवर्ड स्नॅक्स वेगाने वाढणाऱ्या श्रेणी म्हणून उदयास येत आहेत. पुरूषांमध्ये नट्स आणि सुका मेवा, चॉकलेट्स, आणि जॅम व स्प्रेड्स यांची मागणी वाढत आहे, तर महिलांच्या खरेदीत व्हॅल्यू एडेड चहा, कॉफी आणि खाण्यायोग्य बियांचा अधिकाधिक समावेश करत आहेत. त्यामुळे कार्यात्मक पोषण, प्रीमियम स्नॅकिंग आणि दैनंदिन सकस उत्पादनांची मागणी वाढत आहे.

भारतातील ग्राहक आरोग्यदायी पर्यायांच्या शोधात आहेत. त्यामुळे कोल्ड-प्रेस्ड तेल, ऑलिव्ह तेल, प्रोटीन ओट्स, प्रोटीन मुसली, प्रीमियम सुका मेवा, अस्सल तूप आणि खजूर यांना मोठी मागणी मिळत आहे. गेल्या वर्षभरात या उत्पादनांच्या शोधात ८०% वाढ झाली आहे. हे भारतातील टियर २ आणि टियर ३ शहरांच्या नेतृत्वाखाली सक्रिय आरोग्याकडे होत असलेल्या बदलाचे द्योतक आहे.

फ्लिपकार्टचे कन्झ्युमेबल्स (एफएमसीजी आणि जनरल मर्चंडाईज) विभागाचे उपाध्यक्ष निशांत दलाल म्हणाले, “भारतात अन्नपदार्थ आता केवळ नित्यक्रमापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. ते अधिकाधिक आरोग्य, ओळख आणि नवनवीन गोष्टींचा शोध घेण्याचे माध्यम बनत आहे. महानगरांमधील तसेच संपूर्ण भारतातील ग्राहक आपल्या आहाराबाबत अधिक जागरूकतेने निवड करत आहेत आणि डिजिटल कॉमर्समुळे पूर्वीपेक्षा अधिक घरांना उत्तम अन्नपदार्थांचे पर्याय उपलब्ध होत आहेत. फ्लिपकार्टमध्ये आम्ही एक अशी परिसंस्था तयार करत आहोत जिथे सर्व आकारांचे ब्रँड्स वाढू शकतील, क्रिएटर्स नवनवीन गोष्टींचा शोध घेण्यासाठी प्रेरणा देऊ शकतील आणि ग्राहक त्यांच्या बदलत्या जीवनशैलीसाठी योग्य ती उत्पादने आत्मविश्वासाने शोधू शकतील.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

वाढत्या महागाईच्या जोखमीदरम्यान आरबीआय ने व्याजदरवाढीचे चक्र सुरू केले: साक्षी गुप्ता, प्रिन्सिपल इकॉनॉमिस्ट, एचडीएफसी बँक

वाढत्या महागाईच्या जोखमीदरम्यान आरबीआय ने व्याजदरवाढीचे चक्र सुरू केले: साक्षी गुप्ता, प्र…