no images were found
अदाणी एंटरप्रायझेसच्या कच्छ कॉपर आणि कॅराव्हेल मिनरल्सने ऑस्ट्रेलियन कॉपर प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यासाठी केला धोरणात्मक सामंजस्य करार
अहमदाबाद :कॅराव्हेल मिनरल्स लिमिटेड (ASX: CVV) ने कच्छ कॉपर लिमिटेड (केसीएल) जी अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेडची उपकंपनी आहे हिच्याशी एक ऐतिहासिक, बंधनमुक्त सामंजस्य करार (एमओयू) केला आहे.या कराराचा उद्देश पश्चिम ऑस्ट्रेलियातील मर्चिसन प्रदेशातील कॅराव्हेल कॉपर प्रकल्पावर धोरणात्मक सहकार्य स्थापन करणे हा आहे.
या एमओयू अंतर्गत दोन्ही कंपन्या गुंतवणूक आणि ऑफटेक संधींचा शोध घेतील, जेणेकरून प्रकल्पाच्या विकासाला गती देऊन 2026 मध्ये अंतिम गुंतवणूक निर्णय (FID) घेता येईल. यामध्ये कॅराव्हेलच्या जागतिक दर्जाच्या संसाधनांना अदाणी समूहाच्या स्मेल्टिंग,प्रोसेसिंग आणि लॉजिस्टिक्समधील कौशल्याशी जोडले जाणार आहे.
या भागीदारीअंतर्गत दोन्ही कंपन्यांनी एक एक्सक्लुझिव्ह फ्रेमवर्क स्थापन केला आहे, ज्यामध्ये प्रकल्पाच्या संपूर्ण कालावधीसाठी कॉपर कॉन्सन्ट्रेटच्या100 टक्क्यांपर्यंतच्या ऑफटेक करारासाठी वाटाघाटी करण्यात येतील.या प्रकल्पातून सुरुवातीच्या वर्षांत दरवर्षी अंदाजे 62,000 ते 71,000 टन पेयेबल कॉपर उत्पादन अपेक्षित आहे. हे कॉन्सन्ट्रेट थेट कच्छ कॉपर स्मेल्टरला पुरवले जाईल.ही 1.2 अब्ज अमेरिकन डॉलर (1.8 अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलर) गुंतवणुकीची अत्याधुनिक सुविधा गुजरात,भारत येथे उभारली जात आहे, जी जगातील सर्वात मोठी एकाच ठिकाणी असलेली कॉपर सुविधा ठरणार आहे.
“कॉपर हे जागतिक ऊर्जा संक्रमणाचे कणा आहे,आणि कॅराव्हेल मिनरल्सबरोबरची आमची भागीदारी भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या भूमिकेला बळकट करते,ज्यायोगे या अत्यावश्यक धातूसाठी लवचिक आणि जबाबदार पुरवठा साखळी निर्माण करता येईल,” असे डॉ.विनय प्रकाश,सीईओ – नॅचरल रिसोर्सेस,अदाणी यांनी सांगितले.
“अदाणीच्या कच्छ कॉपरसोबतचे हे सहकार्य कॅराव्हेल कॉपर प्रकल्पाच्या पूर्ण क्षमतेची पूर्तता करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे.यात अदाणीच्या डाउनस्ट्रीम कौशल्याचा आणि कॅराव्हेलच्या जागतिक दर्जाच्या संसाधनांचा संगम झाला आहे,” असे डॉन हायमा, व्यवस्थापकीय संचालक, कॅराव्हेल मिनरल्स लिमिटेड यांनी सांगितले.
पर्थपासून सुमारे 150 किमी ईशान्येस असलेला कॅराव्हेल कॉपर प्रकल्प हा ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठ्या न उभारलेल्या कॉपर संसाधनांपैकी एक आहे,ज्यामध्ये सुमारे 1.3 दशलक्ष टन पेयेबल कॉपरचे अंदाजित साठे असून, 25 वर्षांहून अधिक खाण आयुष्य अपेक्षित आहे.या प्रकल्पाचा AISC(All-In Sustaining Cost) प्रति पौंड 2.07 अमेरिकन डॉलर इतका अपेक्षित आहे,ज्यामुळे तो जगातील सर्वात कमी खर्चिक उत्पादकांपैकी एक ठरेल.
करारानुसार,कच्छ कॉपरला प्रकल्पात थेट इक्विटी किंवा प्रकल्प-स्तरीय गुंतवणुकीत भाग घेण्याचा पहिला अधिकार देण्यात आला आहे.या चर्चा प्रकल्पाच्या 1.7 अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलरच्या प्रारंभिक भांडवली खर्चाशी (Capex) संरेखित आहेत आणि टप्प्याटप्प्याने विकासाला चालना देण्यासाठी रचल्या गेल्या आहेत.
प्रकल्पाच्या वित्तपुरवठ्याबाबतही आघाडीच्या बँका आणि निर्यात कर्ज एजन्सी (ECA) यांच्यासोबत चर्चा सुरू आहे.या चर्चांमध्ये डॅनिश उपकरण पुरवठादारांसाठी ECA-आधारित उपाय, पारंपरिक कर्ज, इक्विटी उभारणी तसेच स्ट्रीमिंग आणि रॉयल्टीसारख्या नाविन्यपूर्ण वित्तीय संरचना यांचा समावेश आहे. याआधी 2023 मध्ये डेन्मार्कच्या Export and Investment Fund (EIFO) कडून डॅनिश-स्रोत उपकरणांसाठी अभिरुची पत्र (Letter of Interest) मिळाले आहे.
या एमओयू मध्ये दोन्ही कंपन्यांमधील संयुक्त अभियंता कार्यप्रवाह (co-engineering),उत्पादन तपशीलांचे ऑप्टिमायझेशन, संयुक्त खरेदी प्रक्रिया (joint procurement) ज्यामुळे वेळेत वितरण शक्य होईल, तसेच भारत-ऑस्ट्रेलिया मुक्त व्यापार करार (FTA) अंतर्गत क्रॉस-बॉर्डर संसाधन विकास आणि कार्यबल प्रशिक्षण प्रोत्साहनाच्या बाबींचाही समावेश आहे.
2040 पर्यंत जागतिक कॉपरची मागणी 50% ने वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, आणि या पार्श्वभूमीवर कॅराव्हेल आणि कच्छ कॉपरमधील सहकार्य हे महत्त्वाच्या खनिजांच्या पुरवठा साखळ्यांना बळकट करेल तसेच भारत आणि ऑस्ट्रेलियासाठी शाश्वत आर्थिक वृद्धीला गती देईल.दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या ESG (पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन) कामगिरीत उत्कृष्टता दर्शवली असून,जबाबदार खाणकाम आणि शाश्वत पुरवठा साखळ्यांबाबत सामायिक बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली आहे.