no images were found
झी ५ वर दशावतारचे अनावरण
~ दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या दशावतार या भव्य पौराणिक संदर्भ असलेल्या कलाकृतीचा जागतिक डिजिटल प्रीमियर झी ५ वर सादर ~
राष्ट्रीय, : सुबोध खानोलकर दिग्दर्शित आणि ओशन फिल्म कंपनी तसेच ओशन आर्ट हाऊस निर्मित दशावतार या भव्य पौराणिक कलाकृतीचा जागतिक डिजिटल प्रीमियर झी ५ सादर करते. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, सिद्धार्थ मेनन, आरती वडगबाळकर, रवी काळे आणि विजय केंकरे यांच्यासह उत्कृष्ट कलाकारांचा समावेश असलेला हा सिनेमा पौराणिक कथा, भावना आणि दिमाखदार दृश्याच्या विलक्षण भट्टीत मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट कलाकारांना एकत्र आणतो.
भगवान विष्णूच्या दहा अवतारांच्या कालातीत आख्यायिकेची गुंफण अलीकडच्या कथानकात करताना, दशावतार हे वाईटावर चांगल्याचा विजय आणि सार्वत्रिक संतुलन साधण्याचे प्रतीक आहे. गुंतागुंतीची मांडणी, पारंपरिक वेशभूषा आणि चित्तथरारक छायाचित्रणासह, हा सिनेमा भक्ती, धैर्य आणि सांस्कृतिक वारसा खोलवर खिळवून ठेवणाऱ्या सिनेमा दृष्टीकोनातून साजरा होतो. ‘दशावतार’ चा प्रीमियर 14 नोव्हेंबर रोजी केवळ झी ५ वर होणार आहे.
महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यात घडणाऱ्या या सिनेमाची कथा बाबुली मेस्त्री (दिलीप प्रभावळकर) या ज्येष्ठ दशावतार कलाकारावर आधारित आहे. जो पवित्र लोकनाट्य परंपरेचे जतन करण्यासाठी समर्पित आहे. त्याची दृष्टी अधू होऊनही, बाबुली अविचल विश्वासाने कामगिरी करत राहतो. परंतु महाशिवरात्रीच्या एका अंतिम प्रस्तुतीकरणादरम्यान, कलेचे सादरीकरण आणि देवत्व यांच्यातील रेषा अस्पष्ट होऊ लागते. कारण बाबुली उग्र रुद्र अवतार घेतो- विश्वास, कर्तव्य आणि नियती यांच्यातील शाश्वत संघर्षाचे प्रतिबिंब असलेल्या भावनिक आणि आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात करतो.
चीफ चॅनल ऑफिसर – झी मराठी आणि बिझनेस हेड – मराठी झी ५ व्ही. आर. हेमा यांनी सांगितले की, झी ५ मध्ये, सिनेमातील कथाकथनाची पुनर्रचना करताना महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा साजरा करणाऱ्या कथा सादर करण्यात आम्हाला अभिमान वाटतो. ‘दशावतार’ हा मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक मैलाचा दगड असून एक दृश्यमय देखावा आणि भावनिकदृष्ट्या सखोल अनुभव जो पौराणिक कथा आणि आजच्या वास्तविक समस्यांचा सखोल आणि कलात्मकतेने शोध घेतो. दिलीप सरांनी वठवलेली शक्तिशाली व्यक्तिरेखा, सुबोध खानोलकर यांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि संपूर्ण कलाकारांच्या भावपूर्ण अभिनयासह, हा चित्रपट एक दैवी प्रवास आहे. जो आपल्या प्रेक्षकांना अनुभव देईल. 14 नोव्हेंबर रोजी विशेषत्वाने झी ५ वर ‘दशावतार‘ चा प्रीमियर करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.
दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सांगितले की, “दशावतार‘ ही माझ्यासाठी केवळ एक कथा नाही तर माझ्या बालपणीच्या आठवणींचा एक कोनाडा आहे. मी लहान असल्यापासून कोकणातील माझ्या मूळ गावी दशावतारींचे सादरीकरण पाहिले आहे. निसर्गाची भव्यता अनुभवली आहे आणि अनोख्या लोकांना भेटलो आहे. या सर्व गोष्टींचे सार या सिनेमात कैद करण्याचा मी प्रयत्न केला आहे. आपल्या देशाचे स्वरूप, कलाप्रकार आणि परंपरा अफाट विविधतेने भरलेल्या आहेत-तरीही त्यांच्यात एक सखोल संबंध आहे. आपल्या भूप्रदेशात आणि लोककलांमध्ये भव्यता आहे आणि चैतन्यदायी ऊर्जा देखील आहे. हा सिनेमा त्या सर्वांचा उत्सव साजरा करतो. हे केवळ भारतातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळावे अशी माझी इच्छा आहे-आणि मला खरोखर विश्वास आहे की ते प्रत्येकामध्ये प्रतिध्वनित होईल.”
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी सांगितले की, ‘बाबुली मेस्त्रीची भूमिका मी बजावतो. हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात सखोल अनुभवांपैकी एक होता-एक अशी भूमिका ज्यात केवळ अभिनयच नव्हे तर शरणागती देखील अपेक्षित होती. सुबोध खानोलकर यांच्या संवेदनशील मार्गदर्शनाखाली, प्रत्येक क्षण भावना आणि उद्देशाने जिवंत वाटत होता. या कलाकृतीला मिळालेल्या प्रेमाबद्दल मी खूप आभारी आहे आणि 14 नोव्हेंबरपासून झी ५ वर प्रदर्शित होणाऱ्या दशावतार’चा अनुभव कधी एकदा घेतो असं झाले आहे.”