Home मनोरंजन निरागसता आणि कल्पना: सोनी सबवरील बालकलाकार सांगत आहेत, बाल दिन का खास 

निरागसता आणि कल्पना: सोनी सबवरील बालकलाकार सांगत आहेत, बाल दिन का खास 

15 second read
0
0
35

no images were found

निरागसता आणि कल्पना: सोनी सबवरील बालकलाकार सांगत आहेत, बाल दिन का खास 

 बाल दिन म्हणजे सळसळत्या भावना, कुतूहल आणि भविष्याला आकार देणारी अफाट ऊर्जा यांचा आनंद सोहळा आहे. हा असा दिवस आहे, जेव्हा हवेत हास्य भरलेले असते, निरागसता हास्य फुलवते आणि प्रत्येक क्षणात नवीन स्वप्न आणि शोधाचे स्वप्न असते. यावर्षी, सोनी सबवरील सुभान खान, एकांश कथोरिया, आएशा विंधारा, परी भट्टी आणि रोशन वालकर हे गुणी बाल-कलाकार आपण हा खास दिवस कसा साजरा करणार हे शेअर करत आहेत. आपल्या चाहत्यांसाठी ते काय संदेश देत आहेत पाहू या.

‘गाथा शिव परिवार की – गणेश कार्तिकेय’ मालिकेत कार्तिकेयाची भूमिका करणारा सुभान खान म्हणतो, “बाल दिनी हा विचार प्रकर्षाने मनात येतो की, प्रत्येक मुलात काही तरी खास असतं. क्रीडा, वाचन किंवा इतरांशी मैत्री करणं असं काहीही असू शकतं. यावर्षी माझ्या मित्रांना मी हेच सांगेन की: नवीन गोष्टी करायला घाबरू नका. कार्तिकेयची भूमिका करण्यासाठी मला जे प्रशिक्षण देण्यात आले, ते खूप कठीण होते. कलरीपायट्टू शिकणे सोपे नव्हते. पण या प्रत्येक आव्हानामुळे मी अधिक कणखर झालो. माझे लक्ष अधिक केंद्रित झाले. कार्तिकेयाची भूमिका करताना मी हे शिकलो की, खरी ताकद शिस्तीत आणि दयाळूपणात आहे.”

‘गाथा शिव परिवार की – गणेश कार्तिकेय’ मालिकेत गणेशाची भूमिका करणारा एकांश कथोरिया म्हणतो, “बाल दिन हा माझा आवडता दिवस आहे. कारण हा दिवस लहान असण्यात किती आनंद आहे, याची आठवण मला देतो. मला गेम्स खेळायला आवडते, माझ्या मित्रांसोबत थट्टा-मस्करी करायला आणि कोणत्याही चिंतेशिवाय आनंदी राहायला आवडते. दरवर्षी मी या दिवसाची वाट बघतो कारण या दिवशी आम्हाला शाळेत खूप खूप चॉकलेट आणि काही तरी विशेष मिळते. मी माझ्या मित्रांना नेहमी सांगतो की, प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे, नव्या गोष्टी शिकत राहिले पाहिजे आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवला पाहिजे. यामुळेच लहान असणे खास असते!”

‘इत्ती सी खुशी’ मालिकेत चिडियाची भूमिका करणारी आएशा विंधारा म्हणते, “बाल दिनी मी सर्व मुलांसाठी सुखाची, आनंदाची कामना करते, मग ते शाळेत असो, घरी असो किंवा सेटवर असो. मी नेहमी माझ्या भावंडांना मदत करण्याचा प्रयत्न करते आणि मित्रांना प्रोत्साहन देते. लहान मुले दररोज ज्या लहान सहान गोष्टी करतात, त्यांची दखल घेऊन त्यांच्यावर प्रेम केले पाहिजे. चिडियाची भूमिका करताना मला हे समजले आहे की, माझे कुटुंब आणि माझे मित्र-मैत्रिणी किती महत्त्वाचे आहेत.”

पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत स्वराची भूमिका करणारी परी भट्टी म्हणते, “माझ्यासाठी बाल दिन हा केवळ साजरा करण्याचा दिवस नाही, तर स्वप्न बघणे किती महत्त्वाचे आहे, हे समजण्याचा दिवस आहे. मी अलीकडेच स्वराच्या भूमिकेत आले आहे. या भूमिकेने मला दाखवले आहे की, प्रत्येक लहान मूल देखील आव्हानांना तोंड देत असते. पण आपण जर स्वतःवर विश्वास ठेवला, तर काहीही शक्य आहे. मी माझ्या मित्र-मैत्रिणींना सांगेन की एकमेकांना मदत केली पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहण्याचे निमित्त शोधले पाहिजे.”

पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत रोशनची भूमिका करणारा रोशन वालकर म्हणतो, “मी शाळेत हे शिकलो आहे की, आपले माजी पंतप्रधान श्री. जवाहरलाल नेहरू बाल दिन साजरा करत असत, कारण लहान मुले या देशाचे भविष्य आहे हा त्यांचा विश्वास होता. हा विचार करताना मला छान वाटतं. अभिमान वाटतो. मी नेहमी नव्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. मला अभिनय करायला फारच आवडते. हा दिवस मला नेहमी आसपासच्या जगाबाबत जिज्ञासू आणि रोमांचित राहण्याचे स्मरण देतो. मला वाटते या दिवशी आणि प्रत्येक दिवशी लहान मुलांना हे जाणवून दिले पाहिजे की, ते खास आहेत आणि त्यांच्यावर सगळेजण प्रेम करतात.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…