Home Uncategorized अदाणी ग्रीनची लंडनच्या सायन्स म्युझियममध्ये जागतिक ऊर्जा परिषद; सागर अदाणी यांनी जलद विद्युतीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले

अदाणी ग्रीनची लंडनच्या सायन्स म्युझियममध्ये जागतिक ऊर्जा परिषद; सागर अदाणी यांनी जलद विद्युतीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले

31 second read
0
0
7

no images were found

अदाणी ग्रीनची लंडनच्या सायन्स म्युझियममध्ये जागतिक ऊर्जा परिषद; सागर अदाणी यांनी जलद विद्युतीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले

लंडन, भारत, : अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेड (एजीईएल) चे एग्जीक्यूटिव डायरेक्टर सागर अदाणी यांनी ऊर्जा सुरक्षितता मजबूत करण्यासाठी आणि देशाच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी विद्युतीकरण (इलेक्ट्रिफिकेशन) अधिक वेगाने करण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, ऊर्जा साठवण (स्टोरेज) तंत्रज्ञानासह नवीकरणीय ऊर्जेचा वापर केल्यास स्वच्छ, परवडणारी आणि चोवीस तास अखंड वीजपुरवठा शक्य होईल.

सागर अदाणी यांनी लंडन क्लायमेट अॅक्शन वीक दरम्यान लंडनमधील सायन्स म्युझियम येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या ‘अदाणी ग्रीन एनर्जी डायलॉग’ कार्यक्रमात हे मत व्यक्त केले. हा कार्यक्रम अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेड (एजीईएल) आणि एनर्जी ट्रान्झिशन्स कमिशन (ETC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या चर्चासत्रात धोरणकर्ते, गुंतवणूकदार, उद्योग क्षेत्रातील नेते आणि हवामान तज्ज्ञ सहभागी झाले. स्वच्छ ऊर्जेकडे होणाऱ्या संक्रमणाला गती देण्यासाठी आवश्यक धोरणे, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा यावर या कार्यक्रमात सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी सागर अदाणी म्हणाले, “ऊर्जा सुरक्षितता, परवडणारी ऊर्जा आणि शाश्वत विकास ही आजच्या काळातील सर्वात मोठी आव्हाने आहेत. या तिन्ही आव्हानांवर प्रभावी उपाय म्हणून विद्युतीकरण (इलेक्ट्रिफिकेशन) हा सर्वात प्रभावी मार्ग ठरत आहे. ज्या देशांना मजबूत आर्थिक विकास आणि ऊर्जा क्षेत्रात अधिक स्वावलंबन हवे आहे, त्यांच्यासाठी विद्युतीकरणाचा वेग वाढवणे हा आता पर्याय नसून अत्यावश्यक गरज बनली आहे.

ते पुढे म्हणाले, “बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम (BESS) आणि पंप्ड स्टोरेज प्रोजेक्ट्स (PSPs) यांसारख्या ऊर्जा साठवण तंत्रज्ञानासोबत नवीकरणीय ऊर्जेचा वापर केल्यास त्याची खरी क्षमता समोर येते. त्यामुळे स्वच्छ वीज विश्वासार्ह, परवडणारी आणि चोवीस तास उपलब्ध होऊ शकते. अदाणी ग्रीनमध्ये आम्ही ही संकल्पना प्रत्यक्षात आणत आहोत. २०३० पर्यंत ५० गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमता उभारण्याच्या दिशेने आम्ही वाटचाल करत आहोत. यामध्ये गुजरातमधील खावडा येथे उभारला जात असलेला जगातील सर्वात मोठा नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावत असून, येथे मोठ्या प्रमाणावर ऊर्जा साठवण तंत्रज्ञानासह स्वच्छ ऊर्जा विकसित केली जात आहे.”

जगातील सर्वात मोठ्या स्वतंत्र हवामानविषयक उपक्रमांपैकी एक असलेल्या लंडन क्लायमेट अॅक्शन वीक दरम्यान आयोजित या चर्चासत्रातून हवामान बदलाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य, आवश्यक धोरणात्मक बदल, नाविन्यपूर्ण कल्पना आणि ऊर्जा संक्रमणासाठी आवश्यक गुंतवणूक यांचे वाढते महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

या कार्यक्रमात दोन उच्चस्तरीय चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. एनर्जी ट्रान्झिशन्स कमिशन (ईटीसी) चे सह-अध्यक्ष लॉर्ड अडायर टर्नर आणि अँबिशन लूपचे सह-संस्थापक तसेच यूके क्लायमेट चेंज कमिटीचे अध्यक्ष नायजेल टॉपिंग यांनी या चर्चासत्रांचे अध्यक्षस्थान भूषवले. या चर्चासत्रात ऑक्टोपस एनर्जी, श्नायडर इलेक्ट्रिक, क्लायमेट बाँड्स इनिशिएटिव्ह, ग्रीन फायनान्स इन्स्टिट्यूट आणि अदाणी समूहातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले. ऊर्जा, वित्त, तंत्रज्ञान आणि शाश्वत पायाभूत सुविधा या क्षेत्रांतील तज्ज्ञांनी स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला गती देण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि संधींवर विचारमंथन केले.

या चर्चासत्रात बोलताना लॉर्ड अडायर टर्नर म्हणाले, “शून्य उत्सर्जनावर आधारित अर्थव्यवस्था उभारण्यासाठी आणि जागतिक तापमानवाढ नियंत्रित ठेवण्यासाठी अनेक स्तरांवर काम करावे लागेल. मात्र, त्यातील सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे स्वच्छ विद्युतीकरण (इलेक्ट्रिफिकेशन). अर्थव्यवस्थेतील जास्तीत जास्त क्षेत्रांमध्ये वीजेचा वापर वाढवणे आणि वीज निर्मिती अधिकाधिक कार्बनमुक्त करणे आवश्यक आहे. चांगली बाब म्हणजे रस्ते वाहतूक, इमारतींचे तापमान नियंत्रण आणि उद्योगांमधील कमी तापमानाच्या उष्णतेच्या गरजांसाठी विद्युतीकरण आधीच किफायतशीर ठरत आहे. तसेच तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जड उद्योगांमध्ये लागणाऱ्या उच्च तापमानाच्या उष्णतेसाठीही वीजेचा वापर शक्य होत आहे.”

या संवादात बोलताना नायजेल टॉपिंग म्हणाले, “वीज निर्मिती प्रणाली कार्बनमुक्त करण्यासाठीची गुंतवणूक वाढत असली तरी अर्थव्यवस्थेतील अजूनही जीवाश्म इंधनावर अवलंबून असलेल्या क्षेत्रांचे विद्युतीकरण केल्यासच खऱ्या अर्थाने आर्थिक आणि पर्यावरणीय लाभ मिळतील. तंत्रज्ञानाचा खर्च सातत्याने कमी होत असल्याची जाणीव आणि आधुनिक वीज ग्रीडमध्ये लवचिकतेचे महत्त्व समजून घेतल्यास आवश्यक असलेली मोठी गुंतवणूक आकर्षित करणे शक्य होईल.”

या चर्चासत्रात दोन प्रमुख मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला. विद्युतीकरणाला अधिक गती देणे आणि नवीकरणीय ऊर्जा, ऊर्जा साठवण (स्टोरेज) तसेच आधुनिक वीज वितरण पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवणे.

युरोप, आशिया आणि उत्तर अमेरिकेत वाढत्या उष्णतेच्या लाटा, शीतकरण (कूलिंग) मिळवण्यासाठी वाढणारी वीज मागणी आणि वीज व्यवस्थेवर वाढत असलेला ताण या पार्श्वभूमीवर सहभागी तज्ज्ञांनी मजबूत आणि विश्वासार्ह वीज व्यवस्था ही आर्थिक विकास टिकवून ठेवण्यासाठी तसेच जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद केले.

अर्थव्यवस्था अधिकाधिक डिजिटल आणि ऊर्जेवर आधारित होत असताना, विश्वासार्ह आणि स्वच्छ वीजपुरवठा हा कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), प्रगत उत्पादन उद्योग, डेटा सेंटर्स आणि डिजिटल पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रांच्या विकासासाठी अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. या क्षेत्रांमध्ये वेगाने होत असलेल्या वाढीमुळे भविष्यात जागतिक स्तरावर वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची अपेक्षा आहे.

या वाढत्या मागणीची शाश्वत पद्धतीने पूर्तता करण्यासाठी दीर्घकालीन स्थिर धोरणे, सातत्यपूर्ण गुंतवणूक आणि नवीकरणीय ऊर्जा, ऊर्जा साठवण (स्टोरेज) तसेच वीज वहन (ट्रान्समिशन) पायाभूत सुविधांचा वेगाने विस्तार करणे आवश्यक असल्याचे सहभागी मान्यवरांनी सांगितले. तसेच, ऊर्जा साठवण व्यवस्था हे विश्वासार्ह, परवडणारी आणि चोवीस तास उपलब्ध स्वच्छ वीज पुरवण्यासाठी तसेच नवीकरणीय ऊर्जेचा अधिक व्यापक वापर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी नमूद केले.

अदाणी समूहाने ऊर्जा संक्रमण आणि त्यासंबंधित पायाभूत सुविधांच्या विकासासाठी १०० अब्ज अमेरिकन डॉलर्सहून अधिक गुंतवणुकीची वचनबद्धता व्यक्त केली आहे. खासगी क्षेत्रातील अशा प्रकारच्या जगातील सर्वात मोठ्या गुंतवणूक उपक्रमांपैकी हा एक आहे. नवीकरणीय ऊर्जेसोबतच अदाणी समूह वीज वहन व्यवस्था, ऊर्जा साठवण, हरित हायड्रोजन, डिजिटल पायाभूत सुविधा आणि पुढील पिढीच्या औद्योगिक परिसंस्थांमध्येही गुंतवणूक करत असून, कमी कार्बन उत्सर्जन असलेल्या अर्थव्यवस्थेकडे होणाऱ्या संक्रमणाला गती देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी मान्यवरांनी लंडनमधील सायन्स म्युझियममध्ये अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेड (एजीईएल) च्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या ‘एनर्जी रेव्होल्यूशन : द अदाणी ग्रीन एनर्जी गॅलरी’ ला भेट दिली. या गॅलरीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आकर्षक आणि संवादात्मक प्रदर्शनांद्वारे जगभरात स्वच्छ व कमी कार्बन उत्सर्जन असलेल्या ऊर्जेकडे होत असलेल्या संक्रमणामागील तंत्रज्ञान आणि नवकल्पना सादर करण्यात आल्या आहेत. तसेच, भविष्यातील ऊर्जा व्यवस्थेला आकार देणाऱ्या महत्त्वाच्या निर्णयांची माहितीही अभ्यागतांना येथे दिली जाते. मार्च २०२४ मध्ये सुरू झाल्यापासून या गॅलरीला १० लाखांहून अधिक अभ्यागतांनी भेट दिली असून, ऊर्जा संक्रमणाविषयी जनतेत वाढत असलेली जागरूकता आणि उत्सुकता याचे हे प्रतीक आहे.

यापूर्वी या आठवड्यात झालेल्या अदाणी समूहाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) अध्यक्ष गौतम अदाणी यांनी भारताच्या वाढत्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी समूहाची वचनबद्धता पुन्हा स्पष्ट केली. नवीकरणीय ऊर्जा, हरित हायड्रोजन, ऊर्जा साठवण (स्टोरेज), वीज वहन (ट्रान्समिशन), डिजिटल पायाभूत सुविधा आणि अणुऊर्जा अशा विविध स्रोतांवर आधारित ऊर्जा पोर्टफोलिओ विकसित करण्यावर समूहाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी १० गिगावॅटपर्यंत अणुऊर्जा क्षमता विकसित करण्याची योजना जाहीर केली. नवीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जा साठवण तंत्रज्ञानाला पूरक म्हणून अणुऊर्जेचा वापर करून विश्वासार्ह, परवडणारी आणि कमी कार्बन उत्सर्जन असलेली वीज मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे समूहाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते  सेवा रुग्णालय येथे शुभारंभ

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते  सेवा रुग्णालय येथे…