
no images were found
आपली रेषा मोठी करा, दुसऱ्याची पुसायला जाऊ नका :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
मुंबई :- माझ्या एका मित्राने मला खूप चांगली गोष्ट सांगितली होती. तो मला म्हणाला होता राजकारण हा ईर्ष्या, मत्सर, द्वेष, अहंकार, अभिनिवेष यांचा खेळ आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे दोन रेषा आहेत, एक तुमची आहे आणि एक दुसऱ्याची आहे. आता तुमच्याकडे दोन मार्ग आहे एक म्हणजे दुसऱ्याची रेषा पुसण्याचा प्रयत्न करणं किंवा आपली रेषा मोठी करणं. आपण नेहमी आपली रेषा मोठी करायला पाहिजे, दुसऱ्याची पुसायला जाऊ नये असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमांमध्ये बोलताना दिला.
अजित पवार यांचा गट सत्तेत सहभागी झाल्याने मंत्रिपदाच्या रांगेत असणाऱ्या अनेक नेत्यांना हात चोळत बसावे लागत आहे. यावरही गडकरी यांनी भाष्य केले. जे मंत्री होणार होते ते आता आपल्याला संधी मिळणार की नाही याकरिता दुःखी आहेत. कारण प्रचंड गर्दी झाली आहे. आधीपासूनच सगळे नवीन ‘कोट’ शिवून बसले होते. मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या वाढवता येत नाही, असा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लगावला.
महाराष्ट्राच्या राजकीय परंपरा ही देशातील राजकारणापेक्षा वेगळी आहे. वैचारिक मतभेद असतील पण मनभेद नव्हते. मी 18 वर्ष विधीमंडळात होतो. कठोर टीका करायचो, पण व्यक्तीगत मैत्री होती. थोडंसं आता जरा जास्त झाल्यासारखं वाटतं. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सर्वसामान्य लोकांना याचा कंटाळा आला आहे, असे गडकरी म्हणाले.