Home Uncategorized पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे इलेक्ट्रिक वाहनखरेदीकरिता अल्ट्राव्यायोलेटची नवी योजना

पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे इलेक्ट्रिक वाहनखरेदीकरिता अल्ट्राव्यायोलेटची नवी योजना

18 second read
0
0
7

no images were found

पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे इलेक्ट्रिक वाहनखरेदीकरिता अल्ट्राव्यायोलेटची नवी योजना

 

  • इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे अल्ट्राव्हायोलेटने नुकत्याच सुरु केलेल्या किल द पेट्रोल बिल कार्यक्रमाद्वारे ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनांकडे आकर्षित करण्यासाठी योजना आखण्यात आली आहे.
  • अल्ट्राव्हायोलेट एफ ७७ किंवा एक्स-४७ खरेदी करणा-या ग्राहकांना त्यांच्या मागील दुचाकीवर गेल्या दोन वर्षांतील प्रत्येक किलोमीटर अंतराच्या प्रवासाच्या आधारे कॅशबॅक दिली जाईल.
  • गेल्या दोन वर्षांत २० हजार किमी प्रवास केलेल्या ग्राहकांना २० हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार.
  • एफ७७ आणि एक्स-४७ वापरणा-या ग्राहकांना इंधन खर्चा दरमहा ३ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंतची बचत करता येईल.

 बंगळुरु,: – देशभरातील वाढत्या पेट्रोलच्या किंमतीमुळे नागरिकांवर मोठा आर्थिक ताण येत असल्याने अल्ट्राव्हायोलेट कंपनीने नव्या उपक्रमाची घोषणा केली आहे. दुचाकी खरेदी करु इच्छिणा-यांना इलेक्ट्रिक वाहन खरेदी प्रक्रिया सुलभतेने करता यावी, याकरिता कंपनीने किल द पेट्रोल बिल हा उपक्रम सुरु केला आहे. वाहन खरेदी ही खर्चिक प्रक्रिया असते. या खरेदीसंदर्भात प्रत्येक ग्राहक विचारपूर्णक निर्णय घेतो. ग्राहकांची ही सजकता लक्षात घेत अल्ट्राव्हायोलेट कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराची उपयुक्तता, कामगिरी आणि आर्थिक लाभ याबाबत तपशीलवार माहिती देण्यास सुरुवात केली आहे. हा उपक्रम इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणा-यांसाठी लाभदायक ठरेल, असा विश्वास कंपनीच्यावतीने व्यक्त करण्यात आला.

        या उपक्रमाला भेट देणा-या ग्राहकांनी आपल्या दुचाकी वाहनाच्या प्रवासाचा इतिहास तसेच वाहनाचा वापर याबद्दल माहिती दिल्यास त्यांना मोटरसायकलच्या खरेदीवर तब्बल ३० हजार रुपयांपर्यंतचा लाभ घेता येईल. ग्राहकांना हा लाभ त्यांच्या पेट्रोलवर चालणा-या इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रवासाच्या एकूण किलोमीटरच्या आधारे दिला जाईल. या माध्यमातून ग्राहकांना स्वतःहूनच इलेक्ट्रिक वाहनांचा सर्वात मोठा फायदा लक्षात येईल. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराने इंधनबचत होईल. शिवाय या वाहनांची कामगिरी उत्कृष्ट असते. अत्याधुनिक तंत्रज्ञान, विश्वासार्हता आणि प्रवासाचा अनुभवही समाधानकारक असतो. इलेक्ट्रिक वाहन खरेदी किफायतशीर दरात उपलब्ध होत असल्याने आता आधुनिक प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाल्याचे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले.

      नव्या उपक्रमाबद्दल माहिती देताना अल्ट्राव्हायोलेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक नारायण सुब्रमण्यम म्हणाले,” गेल्या काही वर्षांपासून पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे देशभरात चिंतेचे वातावरण आहे. मात्र ग्राहकांचे इंधनावरील अवलंबित्व कमी व्हावे, याकरिता ठोस पावले उचलली गेली आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीबाबत होणा-या परिवर्तनाला व्यावहारिक उपायांची साथ मिळायला हवी, असे आमचे मत आहे. या उपायांमुळे ही वाहन खरेदी प्रक्रिया सोपी तसेच फायदेशीर ठरेल. आमचा हा विचार माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या इलेक्ट्रिक वाहन खरेदीच्या क्रांतीकारी विचारांशी जुळतो. या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही देशभरातील दुचाकी खरेदी करु इच्छिणा-या ग्राहकांना मोठ्या आत्मविश्वासाने हा बदल स्विकारण्यास सक्षम करत आहोत. यामुळे ग्राहकांना वाहनाचा वापरामुळे होणारा दैनंदिन खर्चात कपात करता येईल. शिवाय अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल. देशभरात इलेक्ट्रिक वाहने विकसित होत असताना, दुचाकीस्वारांसाठीही हा बदल सोपा तसेच फायदेशीर ठरेल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”

 

उत्पादन प्रक्रियेतील नाविन्यता, किरकोळ विक्री नेटवर्कचा विस्तार, ग्राहकांचा वाढता विस्तार तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सशक्त स्थान यांमुळे अल्ट्राव्हायोलेटने देशात आघाडीच्या इलेक्ट्रिक वाहन ब्रँण्डपैकी महत्त्वाची कंपनी म्हणून आपले नाव कोरले आहे. या क्षेत्रात पावले विस्तार असताना ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणारी उत्पादने विकसित करण्यावर कंपनीचा भर राहील. कंपनी अत्याधुनिक तंत्रज्ञान, दमदार कामगिरी आणि सर्वोत्कृष्ट अनुभव यांचा योग्य मेळ साधत उत्पादन निर्मिती करण्यासाठी कटिबद्ध राहील. भविष्यातही नाविन्यपूर्ण आणि उच्च दर्ज्याची इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याकरिता विविध योजना कार्यान्वित केल्या जातील.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते  सेवा रुग्णालय येथे शुभारंभ

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते  सेवा रुग्णालय येथे…