no images were found
हिंदी टेलिव्हिजनवर आजवर गाजलेल्या डिटेक्टिव्ह मालिका
80च्या दशकातील गाजर खाणाऱ्या गुप्तचरापासून ते आजकालच्या मालिकांमधील चाणाक्ष, भावनांची छटा दाखवणाऱ्या डिटेक्टिव्ह्ज पर्यंत गेल्या काही दशकांत भारतीय टेलिव्हिजनवर गुन्ह्याची कोडी सोडविणारे अनेक गुप्तचर येऊन गेले. प्रत्येक दशकात रहस्य पडद्यावर ज्या प्रकारे उलगडते, त्याबाबत वेगळेपण दिसते. आणि आता, ही परंपरा पुढे नेत हिंदी जीईसी सोनी सब आपल्या प्रेक्षकांसाठी या प्रकारात डिटेक्टिव्ह कॉमेडी ‘एकेन बाबू’च्या रूपात एक नवा ट्विस्ट घेऊन येत आहे. या मालिकेच्या केंद्रस्थानी अत्यंत तल्लख डोक्याचा, काहीसा विचित्र बंगाली गुप्तचर एकेन आहे. त्याच्या काहीशा गबाळ्या रूपामागे एक तल्लख मेंदू आहे. ही मुळची बंगाली मालिका असून बंगालमध्ये अत्यंत लोकप्रिय झाली आहे. सोनी सबवर या मालिकेच्या हिंदीत डब केलेल्या आवृत्तीची चाहते वाट बघत आहेत. भारतात आजवर गाजलेल्या पाच डिटेक्टिव्ह मालिकांवर एक नजर –
- करमचंद(1985)
चलाख आणि टेक-सॅव्ही तपासकर्त्यांनी टेलिव्हिजनच्या पडद्याचा ताबा घेण्यापूर्वी करमचंद पडद्यावर आला होता. ही भारताची पहिली डिटेक्टिव्ह मालिका होती. 1985 मध्ये सुरू झालेल्या या मालिकेत पंकज कपूर एका चाणाक्ष पण थोड्या विक्षिप्त डिटेक्टिव्हच्या रूपात प्रेक्षकांसमोर आला होता. त्याच्या हातात नेहमी एक गाजर असायचे आणि डोक्यात भन्नाट कल्पना! किटी (सुश्मिता मुखर्जी) ही त्याची एकनिष्ठ पण वेंधळी असिस्टंट त्याच्या सोबत असायची. करमचंदचे चतुर संभाषण आणि गंमतीशीर टायमिंग यामुळे तपासणीची प्रक्रिया रोचक कोड्यासारखी होऊन जायची. या मालिकेने भारतीय टीव्हीवर डिटेक्टिव्ह मालिकेची पठडी लोकप्रिय केली आणि त्याच बरोबर सर्वसामान्य गुन्हेगारी ड्रामाच्या फॉरमॅटला शह देणारा एक विक्षिप्त आणि हजरजबाबी डिटेक्टिव्ह देखील दिला.
2. व्योमकेश बक्षी (1993)
व्योमकेश बक्षी शिवाय भारतीय डिटेक्टिव्ह मालिकांची यादी पूर्ण होऊच शकत नही. रजित कपूर अभिनीत 90 च्या दशकातील या मालिकेने शरदिंदू बंदोपाध्याय यांच्या साहित्यातील डिटेक्टिव्ह जिवंत केला. हा डिटेक्टिव्ह अत्यंत हुशार आणि मार्मिक होता. या मालिकेची मांडणी, कथाकथन, उत्कृष्ट संवाद आणि जुन्या कोलकाताची मोहकता यामुळे ही मालिका लोकप्रिय झाली आणि आजही प्रेक्षकांना ती आठवते.
- CID (1998)
जेव्हा बिंज वॉचिंग सुरू झाले नव्हते, तेव्हा सीआयडी ने भारतीय प्रेक्षकांना आपल्या टीव्ही च्या पडद्याशी खिळवून ठेवले होते. दोन दशकांपेक्षा जास्त काळ चाललेल्या सीआयडी ने एसीपी प्रद्युमन, दया आणि अभिजीत या व्यक्तिरेखा आणि ‘दया, दरवाजा तोड दो!’ सारखे अनेक संवाद दिले, जे प्रेक्षकांच्या संभाषणात रुळले आहेत. रहस्य आणि खतरनाक शोध यांचे मिश्रण असलेल्या सीआयडी मालिकेने समस्त पिढीला गुन्ह्याचा शोध घेण्याची प्रक्रिया, त्यांचे टीमवर्क यांचा परिचय करून दिला आणि ती देशातील एक अत्यंत लोकप्रिय डिटेक्टिव्ह मालिका बनली.
- स्पेशल स्क्वॉड(2204)
आजकालच्या चटपटीत गुन्हेगारी मालिका सामान्य झाल्या, त्या आधीच स्पेशल स्क्वॉड या मालिकेने प्रेक्षकांसमोर एक स्टाइलिश, आधुनिक तपास टीम उभी केली. या टीमचे नेतृत्व करत होता आर्यन खन्ना (भानू उदय). या मालिकेने भारतीय डिटेक्टिव्ह कथाकथनात भावनांची गुंतागुंत आणली. यातील फॉरेन्सिक, इंटेलिजन्स आणि मानसशास्त्र यांचा उपयोग त्याकाळी टीव्ही मालिकांमध्ये प्रचलित नव्हता. या मालिकेच्या कथांची गहनता आणि व्हिज्युअल टोन यांनी भारतीय गुन्हेगारी मालिकांना एक नवी भाषा दिली.
5. एकेन बाबू (या नोव्हेंबरमध्ये सुरू होत आहे)
ही परंपरा पुढे घेऊन जात एकेन बाबू लवकरच हलक्या-फुलक्या, समस्त कुटुंबासाठी अनुकूल मालिकांबद्दल ओळखल्या जाणाऱ्या सोनी सब वाहिनीवर येत आहे. बंगाली भाषेत आठ यशस्वी सीझन आणि तीन हिट चित्रपट देणारा हा अपारंपरिक डिटेक्टिव्ह देशभरातील हिंदी प्रेक्षकांना रिझवण्यासाठी सज्ज आहे. ‘एकेन बाबू’ ही एकेन्द्र सेन (बंगाली अभिनेता अनिर्बन चक्रवर्ती द्वारा अभिनीत) या विचित्र, खवैय्या आणि चतुर डिटेक्टिव्हची गोष्ट आहे. त्याच्या अती सामान्य रूपाच्या मागे एक अत्यंत तल्लख मेंदू दडलेला आहे. त्याच्या विशिष्ट सवयी आणि त्याचा गंमतीशीर स्वभाव नेहमीच्या गंभीर स्वरूपाच्या डिटेक्टिव्हच्या प्रतिमेला शह देतो. आपुलकी आणि हुशारीच्या आवरणात लपेटलेल्या रहस्यांसह ‘एकेन बाबू’ नक्कीच डिटेक्टिव्ह प्रकारात एक नवीन परिमाण घेऊन येईल आणि हे सिद्ध करून दाखवेल की अतिशय कठीण प्रकरणे सोडवण्यासाठी तुम्हाला ट्रेन्च कोट परिधान करण्याची गरज नाही!
गुन्हेगारी प्रकरणांचा शोध घेणाऱ्या मालिकांचे स्वरूप बदलत असते. सोनी सबवरील ‘एकेन बाबू’ या विश्वात एक तल्लख आणि गंमतीशीर डोस घेऊन येणार आहे. ही मालिका आपल्याला याची जाणीव देईल की, जगात अनेक क्लू (संकेत) असले तरी, बऱ्याचदा सत्याचा शोध सगळ्यात आधी विचित्र डोक्यांनाच लागतो.