
no images were found
कोरोनाची लस तयार करणारी कंपनी Pfizerचे CEO अल्बर्ट बोर्ला यांना लस घेऊन कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.
नवी दिल्ली : देशातील कोरोना संसर्ग ओसरला असून, रुग्णसंख्या बरीच कमी झाली आहे. परंतु जगातील काही देशांमध्ये कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय. अनेक दिग्गज मंडळींना कोरोनाची लागण होत आहे. कोरोना लस उत्पादक कंपनी फायझरचे सीईओ अल्बर्ट बोर्ला यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचं आढळून आले आहे. परंतु, बोर्ला यांना सौम्य लक्षणं आहेत. यूएसमध्ये, FDA ने डिसेंबर 2021 मध्ये आपत्कालीन वापरासाठी Paxlovid ला मान्यता दिली. Paxlovid चा वापर सौम्य ते मध्यम लक्षणांसाठी केला जातो. लसीचे दोन आणि चार डोस घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. काहींना सौम्य तर काहींना तीव्र लक्षणं दिसत असून कोरोना संपत चाललाय असं वाटत असताना ही बाब चिंता वाढवणारी आहे