Home आरोग्य H3N2 ची लागण झाल्याने तरुणाचा गेला जीव, देशातील तिसऱ्या मृत्यूने महाराष्ट्राचे टेंशन वाढवलं

H3N2 ची लागण झाल्याने तरुणाचा गेला जीव, देशातील तिसऱ्या मृत्यूने महाराष्ट्राचे टेंशन वाढवलं

13 second read
0
0
42

no images were found

H3N2 ची लागण झाल्याने तरुणाचा गेला जीव, देशातील तिसऱ्या मृत्यूने महाराष्ट्राचे टेंशन वाढवलं

राज्यात करोनाच्या जीवघेण्या संसर्गाचा धोका कमी झाल्यानंतर आता कुठे सर्व काही सुरळीत सुरू आहे. अशात आता ऐका नव्या व्हायरसमुळे राज्याची चिंता वाढली आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह देशाची चिंता वाढवणारी घटना घडली आहे. H3N2 व्हायरसचा पहिला रुग्ण दगावला आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. तर नागपूरातही या संसर्गामुळे एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

अहमदनगर : संपूर्ण महाराष्ट्रासह देशाची चिंता वाढवणारी ही बातमी आहे. सध्या महाराष्ट्रात 170 हून अधिक रुग्ण H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसने बाधित रुग्णांची संख्या आहे. देशातील तिसरा आणि महाराष्ट्रातील पहिल्या . H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसने बाधित रुग्णाचा बळी घेतला आहे. एमबीबीएसचे शिक्षण घेणार्‍या 23 वर्षीय तरुणाचा नगरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर नऊ जणांचे नमुने लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याचे अहवाल प्रलंबित आहे. तरुण औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून मृत्यू झालेला तरुण नगरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता. H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसने मृत्यू झालेला तरुण मागील आठवड्यात कोकणात फिरायला गेला होता. कोकणातून फिरून आल्यावर तो आजारी पडला होता. त्याला सर्दी, ताप आणि खोकला अशी काही लक्षणे आढळून आली होती.

त्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याची कोरोना चाचणी सोबतकह H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसची चाचणी करण्यात आली त्यातही तो बाधित असल्याचे स्पष्ट झाले. तरुणाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल मिळाल्यानंतर या विषाणूमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी या विषाणूमुळे हरियाणा आणि कर्नाटक राज्यात दोन मृत्यू झाले होते. त्यानंतर मंगळवारी नागपुरातही एका महिलेचा मृत्यू झाला होता.

महाराष्ट्रातील H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसचा हाच तरुण पहिला मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची आता चाचणी केली जाणार असून फिरायला गेलेल्या सर्वांची चाचणी केली असून त्यांचे अहवाल प्रलंबित असून त्याची प्रतीक्षा केली जात आहे.वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली असून H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरस बाबत चिंता वाढवणारी बाब निर्माण झाली आहे. या घटनेने राज्य सरकारची चिंता वाढणार असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राहुल आवाडे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय   

राहुल आवाडे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय              …