no images were found
भाजपचे आमदार मदल विरुपक्षप्पा अँड डिटर्जंट लिमिटेड च्या अध्यक्षपदाचा राजीनामा
कर्नाटकात भाजपचे आमदार मदल विरुपक्षप्पा यांचा मुलगा प्रशांत कुमार यांना 40 लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. वडिलांच्या बंगळुरू येथील कर्नाटक सोप अँड डिटर्जंट लिमिटेड कार्यालयातून ही अटक करण्यात आली. कर्नाटक लोकायुक्तांनी त्यांना लाच घेताना रंगेहात पकडले आहे. यानंतर लोकायुक्त अधिकारी प्रशांत यांच्या घरी पोहोचले. येथे त्यांना 6 कोटी रोख मिळाले. मोजणी झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी नोटांचे बंडल बेडवर ठेवले होते.
भाजपचे आमदार मदल विरुपक्षप्पा यांनी कर्नाटक सोप अँड डिटर्जंट लिमिटेड च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मुलाने ज्या टेंडरमध्ये लाच घेतली त्यात माझा सहभाग नसल्याचे त्यांनी सांगितले. विरुपक्षप्पा यांच्या राजीनाम्यापूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले होते की, लोकायुक्त पुन्हा आणण्याचे उद्दिष्ट राज्यातील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करणे आहे.
प्रशांत हे बंगळुरू पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण मंडळ चे मुख्य लेखा अधिकारी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडून रोखीने भरलेल्या तीन बॅगा जप्त करण्यात आल्या आहेत.
याप्रकरणी लोकायुक्तांनी भाजप आमदारालाही आरोपी केले आहे. मात्र, भाजपचे आमदार विरुपक्षप्पा यांनी कोणत्याही टेंडरमध्ये सहभाग असल्याचा इन्कार केला आहे.