no images were found
टेम्पो आणि बसमध्ये भीषण अपघात; महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला ब्रिजवर मध्यरात्री मोठी दुर्घटना झाली.टेम्पो आणि बसमध्ये धडक होऊन अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालकाचा मृत्यू झाला. तसेच बसमधील एक महिला जखमी झाली असून, बसमधील अन्य प्रवाशी सुखरुप आहेत. तर बसच्या चालकाने घटनास्थळावरुन फरार झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे या बसमध्ये कॅथे पॅसिफिक एअरलाईन्सचे कर्मचारी होते, जे ताज लॅण्ड्ल एंड हॉटेलमध्ये जात होते. हे सर्व कर्मचारी परिदेशी नागरिक आहेत.
कॅथे पॅसिफिक एअरलाईन्सचे कर्मचारी मर्सिडिज बेन्सच्या बसमधून हॉटेल ताज लॅण्ड्स एंडमध्ये जात होते. बस वाकोला ब्रिजवर पोहोचताच टेम्पो आणि बसमध्ये जोरधार धडक झाली. या अपघातात टेम्पो चालकाने जागीच प्राण सोडले तर बसचा चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिसांनी गुन्हा नोंद करून, पुढील तपास सुरु केला आहे. दरम्यान या अपघातात बसमध्ये असलेल्या एका महिलेच्या नाकाला दुखापत झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. तसंच बसमधील सर्व कर्मचारी परदेशी नागरिक आहे आणि सर्व जण सुरक्षित आहे. अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही.
अपघातामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. तर टेम्पोमधून माशांची वाहतूक करण्यात येत होती. अपघातानंतर टेम्पोमधील सर्व मासळी रस्त्यावर पसरली होती. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. अपघाताची माहिती मिळताच मुंबई पोलीस, ट्रॅफिक पोलीस आणि अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरु केले.