Home मनोरंजन एण्‍ड टीव्‍ही घेऊन येत आहे कौटुंबिक मालिका ‘दूसरी मॉं’

एण्‍ड टीव्‍ही घेऊन येत आहे कौटुंबिक मालिका ‘दूसरी मॉं’

41 second read
0
0
55

no images were found

एण्‍ड टीव्‍ही घेऊन येत आहे कौटुंबिक मालिका दूसरी मॉं’

आई-मुलाचे नाते शाश्‍वत, नि:स्‍वार्थ, प्रबळ आणि बिनशर्त प्रेमावर आधारित असल्‍याचे मानले जाते. मातृत्‍व प्रेम व आपुलकीला कोणतीही बंधने नसली तरी ते जटिल असू शकते, विशेषत: तो मुलगा तुमच्‍या पतीचा अवैध मुलगा असतो तेव्‍हा अनेक प्रश्‍न निर्माण होतात. आणि नशीब तुम्‍हाला त्‍या मुलासोबत एकाच छताखाली आणते तेव्‍हा काय घडते? अशीच काहीशी यशोदा व कृष्‍णाची कथा आहे, ज्‍यांना नशीब एकत्र आणते आणि त्‍यांच्‍या जीवनाला नकळतपणे कलाटणी मिळते. एण्‍ड टीव्‍ही नवीन कौटुंबिक मालिका ‘दूसरी मॉं’ सादर करण्‍यास सज्‍ज आहे. ही उत्तर प्रदेशमध्‍ये राहणा-या एका महिलेची कथा आहे, जी तिचे पती, दोन मुली व सासरच्‍या माणसांसोबत आनंदाने राहत असते. पण ती आणि तिचा पती नकळतपणे त्‍याच्‍या अवैध मुलाला दत्तक घेतात, तेव्‍हा त्‍यांचे आनंदी व शांतमय कौटुंबिक जीवन अस्‍ताव्‍यस्‍त होऊन जाते. या मालिकेची निर्मिती झी स्‍टुडिओजने केली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्प

  ‘आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्प   कोल्हापू…