
no images were found
मुंबईतील कमलानगर झोपडपट्टीत भीषण आग
मुंबई : मुंबईतील कमला नगर येथील झोपडपट्टीत आज पहाटे ४ वाजण्याच्या भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या २५ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.या भीषण आगीत २५ घरं जळून खाक झाली आहेत. दरम्यान प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात आले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हा परिसर दाटीवाटीचा असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडचणी येत आहेत. तीन तासानंतरही अद्याप आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमनच्या २५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.