no images were found
‘सुमंगल लोकोत्सव’ समृद्ध जीवनासाठी मार्गदर्शक : आ.ऋतुराज पाटील
कोल्हापूर : अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या संकल्पनेतून साकारलेला ‘सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सव’ जनतेला समृद्ध जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. स्वामीजींच्या या महान कार्यातून पुढील पिढी सक्षम बनेल असा विश्वास आ. ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला. काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील याच्यासह कणेरी मठ येथे सुरु असलेल्या महोत्सवाला दिली. यावेळी आ.पाटील बोलत होते.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, भारताची संस्कृती ही जगात महान आहे .आणि ही संस्कृती जपण्याचे काम स्वामीजींच्या माध्यमातून होत आहे. कोल्हापूरचे नाव देश विदेशात या महोत्सवामुळे होणार आहे.सेंद्रिय शेती बद्दल प्रबोधन होऊन शेतकरी याकडे जास्त प्रमाणात वळतील.
यावेळी एच. के. पाटील यांनी सुमंगल पंचमहाभूत नियोजनाबद्दल स्वामीजी व सहकाऱ्यांचे कौतुक केले. हा महोत्सव पहाण्यासाठी देशभरातून लाखो लोक येतील आणि जीवनाचे मार्गदर्शन घेऊन जातील अशा शब्दात त्यानी कौतुक केले.
आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह त्यांच्या सर्वच परिवाराचे मठाला नेहमीच सहकार्य मिळत असल्याचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींनी सांगितले.
यावेळी वृक्षाचे आत्मकथन, सुंदर गावाची निर्मिती, मातीचे क्षितिज, हिमालय पर्वत शृंखला, वाळवी, मुंगी, सर्प यांचे कार्य, मातीची जैवविविधता, गावावर आलेले संकट, खाणीतील दगड काढणे, पूर परिस्थितीतील गाव, कमी क्षेत्रातील बैल मशागत, ग्रामीण जीवनातील विविध कार्य, पडीक क्षारपड जमीन सुधार, कारखान्यांसाठी ऊस वाहतूक, स्वालंबी समृद्ध स्वाभिमानी गाव, गांडूळ खत बनवण्याची वेगवेगळ्या पद्धती, गाव तिथे देवराई हे सर्व पाहून सेंद्रिय शेती पीक प्रात्यक्षिके प्रक्षेत्राला भेट दिली. या ठिकाणी सेंद्रिय गहू, भात, सूर्यफूल, दोडका, भोपळा, कारले, आळंबी, कोबी, फ्लॉवर व गोकृपामृत, जीवामृत बनविण्याच्या पद्धतीची माहिती दिली.