Home मनोरंजन गझल सूद साकारणार ‘कॅट’ची भूमिका

गझल सूद साकारणार ‘कॅट’ची भूमिका

1 min read
0
0
144

no images were found

गझल सूद साकारणार कॅटची भूमिका

घरेलू कॉमेडी हप्‍पू की उलटन पलटनगेल्‍या चार वर्षांपासून प्रेक्षकांना हसवून-हसवून लोटपोट करत आहे. मालिकेमधील प्रत्‍येक पात्राने आपली विनोदीशैली व विलक्षण कृत्‍यांसह प्रेक्षकांच्‍या मनात विशेष स्‍थान निर्माण केले आहे. आणि मालिकेच्‍या कलाकारांमध्‍ये नवीन सामील झाली आहे गझल सूदजी कटोरी सिंग ऊर्फ कॅटची भूमिका साकारणार आहे. दरोगा हप्‍पू सिंग (योगेश त्रिपाठी) व राजेश (कामना पाठक) यांच्‍या मोठ्या मुलीची भूमिका साकारण्‍यासाठी आश्‍ना किशोरच्‍या जागी अभिनेत्रीची निवड करण्‍यात आली आहे. पंजाबमधील लुधियाना येथील निवासी असलेल्या गझलने यापूर्वी काही लोकप्रिय टेलिव्हिजन मालिका व वेब सिरीजमध्‍ये काम केले आहे आणि तीइंग्रजी सराईतने बोलण्‍यास संघर्ष करावी लागणारी विलक्षणपण प्रेमळ व उत्‍साही मुलीची भूमिका साकारण्‍यास उत्‍साहित आहे. ती जे काही म्‍हणते ते इतर लोकांना समजत नसल्‍यामुळे तिला त्‍यांच्‍या रागाचा सामना करावा लागतो. या मालिकेचा भाग होण्‍यास उत्‍साहित असलेली गझल म्‍हणाली,                   ‘‘मला या मालिकेचा भाग होण्‍याचा आनंद होत आहे. ही माझ्या कुटुंबाची देखील आवडती मालिका आहे. मी कॅटची भूमिका पाहण्‍याचा आनंद घेतला आहे आणि मला स्‍वत:सारखीच भूमिका साकारण्‍याची संधी मिळाल्‍याने खूपच आनंद झाला आहे. तिला इंग्रजी बोलताना करावा लागणारा संघर्ष पाहून मी अचंबित होते. कॉमेडी ही माझी आवडती शैली आहेकारण यामधून प्रेक्षकांच्‍या चेहऱ्यावर आनंद आणणारे अस्‍सल मनोरंजन देण्‍यास मिळते. ही मालिका पूर्वीपासून पाहत आली असल्‍यामुळे मी नेहमीच पात्रांची प्रशंसा करते. ही मालिका प्रभावीपणे कॉमेडी सादर करते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शि…