
no images were found
नीती टेलर प्राची कपूरच्या भुमिकेमध्ये
बडे अच्छे लगते हैं 2 मालिकेतील राम आणि प्रिया यांच्यातील प्रगल्भ प्रेम कहाणीमुळे ही मालिका प्रेक्षकांची लाडकी मालिका झाली आहे. हे आकर्षक कथानक आता तब्बल 20 वर्षांची झेप घेणार आहे, ज्यामुळे मालिकेत बरेच नवीन चेहरे दिसणार आहेत. यामध्ये एक महत्त्वाची भूमिका करत आहे लोकप्रिय अभिनेत्री नीती टेलर. नीती ही राम आणि प्रियाची धाकटी मुलगी प्रिया कपूरची भूमिका करणार आहे.प्राचीची तिच्या माता-पित्याशी ओळख नाहीये. त्यामुळे तिची पालक, मार्गदर्शक, गुरु सर्व काही तिची मोठी बहीण पिहूच आहे. आपल्या बहिणीच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा ती आटोकाट प्रयत्न करते, पण तरीही माता-पित्याच्या प्रेमाची उणीव तिला भासतेच. रामसारखीच तीही थोडी भोळसर आहे आणि लोकांच्या चांगुलपणावर तिचा विश्वास आहे.
बडे अच्छे लगते हैं 2 मालिकेत दाखल होताना मला खूपच आनंद होत आहे.जीवनाचे एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखे मला वाटते आहे, कारण या मालिकेच्या पहिल्या सत्रात देखील मी काम केले होते. यावेळी, माझ्या म्हणजे प्राचीच्या परिचयाने कथानक सुरू होते. माझ्यावर दडपण असले, तरी मी उत्तम कामगिरी करण्याचा माझ्याकडून नक्की पूर्ण प्रयत्न करीन.”ती पुढे म्हणते, “प्राची सळसळत्या आणि गोड स्वभावाची आहे. पण तिच्या स्वभावात देखील काही गुंतागुंत आहेच. तिच्यात पिहूसारखा तुटकपणा नाहीये पण भावनिक वादळ तिच्याही मनात आहे. एक अभिनेत्री म्हणून असे बहुपदरी व्यक्तिमत्व पडद्यावर साकारणे माझ्यासाठी रोमांचक आहे. कथानकात येणारी ही झेप लोकांना नक्की एक धक्का देणारी असेल आणि मला आशा आहे की, कथानकाने घेतलेले वळण प्रेक्षकांना आवडेल आणि ते मालिकेवर आणि त्यातील कलाकारांवर असाच प्रेमाचा वर्षाव करत राहतील.”