no images were found
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना प्रकरणी पोलीस महानिरीक्षक श्री सुनील फुलारे यांना भेटून निवेदन
सांगली : दिनांक 26 जानेवारी रोजी काही समाजकंटकांनी मातंग समाज व बहुजन समाजाची अस्मिता व श्रद्धास्थान असणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या सांगली पुष्पराज चौक या ठिकाणी असणाऱ्या पुतळ्यावर चबूतऱ्यावर असणाऱ्या नामकरणावर रंग टाकून पुतळ्याची विटंबना करून सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाला आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणी दोनच दिवसात अपार प्रयत्न करून या प्रकरणाचा छडा लावला त्याबद्दल पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा समस्त समाजाच्या व राष्ट्र विकास सेनेच्या वतीने सत्कार देखील केला.
परंतु या प्रकरणी आम्हास प्रथम दर्शनी सी सी टी व्ही फुटेजमध्ये पुतळ्यावर रंग फेकणारे जे आरोपी दिसतात व अटक केलेले आरोपी यांच्यात फार मोठी तफावत दिसत आहे ,अटक आरोपी आणि साक्षात रंग फेकणारे आरोपी यांचे मध्ये जो प्लॅन झाला त्याच प्रमाणे ते पोलीस प्रशासनाची व मातंग समाजाची दिशाभूल करीत आहोत या बाबत आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना कल्पना दिली आहे ,परंतु ते याबाबत गांभीर्याने विषय घेताना दिसत नाहीत.
तरी मातंग समाजाची दिशाभूल केली जाऊ नये ,सत्य परस्थिती समाजासमोर व जगासमोर यावी ,संमाजकंटकांचे मनोबल वाढू नये त्यांनी समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य करू नये,तसेच या समाजकंटकांनी हे कांड करण्यासाठी प्रजासत्ताक दिनच का निवडला ,याचाही सखोल तपास व्हावा या कारणासाठी हा तपास सी बी आय मार्फत करण्यात यावा अन्यथा राष्ट्र विकास सेनेकडून दिनांक 7 फेब्रुवारी 2023 पासून आपल्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करू असा इशारा प्रशांत सदामते यांनी निवेदनाद्वारे दिला आहे ,यावेळी निवेदन देताना मा अमोस मोरे प्रदेश अध्यक्ष, मा प्रशांत सदामते युवक प्रदेश अध्यक्ष, मा वर्षा कोळी महिला आघाडी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष,मा सचिन कवाळे,मा.विशाल पाटोळे,विवेक कांबळे,अर्जुन बुचडे,आदी बांधव उपस्थित होते.