Home क्राईम अबू धाबी ते मुंबई प्रवासात महिलेचा अर्धनग्न धिंगाणा

अबू धाबी ते मुंबई प्रवासात महिलेचा अर्धनग्न धिंगाणा

38 second read
0
0
230

no images were found

अबू धाबी ते मुंबई प्रवासात महिलेचा अर्धनग्न धिंगाणा

मुंबई : अबू धाबी ते मुंबई विमान प्रवासात एका परदेशी महिलेने गोंधळ घातल्याची घटना घडली. बिसनेस क्लासमधील आसनावरून विमान कर्मचाऱ्याने उठविल्याने या महिलेने त्याला मारहाण केली. त्याच्या अंगावर थुंकली. इतकेच नाही तर अर्धनग्न होऊन विमानात फिरू लागली. विमानातील कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीवरून या महिलेविरुद्ध सहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
काही वेळाने तिने अंगावरील कपडे काढले आणि विमानातच अर्धनग्न होऊन फिरू लागली. वैमानिकानेही त्या महिलेला शांत राहण्यास सांगितले. अखेर मुंबईत विमान उतरल्यानंतर त्या महिलेला विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्याच्या ताब्यात देण्यात आले. कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून महिलेविरोधात विमान अधिनियम १९३७ कलम २२, २३ नुसार गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.                                                         

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर    &nbs…