Home सामाजिक भारतात गॅलेक्‍सी ए57 ५जी आणि गॅलेक्‍सी ए37 ५जी नवीन ऑसम इंटेलिजन्‍स वैशिष्ट्यांसह लाँच

भारतात गॅलेक्‍सी ए57 ५जी आणि गॅलेक्‍सी ए37 ५जी नवीन ऑसम इंटेलिजन्‍स वैशिष्ट्यांसह लाँच

2 min read
0
0
35

no images were found

भारतात गॅलेक्‍सी ए57 ५जी आणि गॅलेक्‍सी ए37 ५जी नवीन ऑसम इंटेलिजन्‍स वैशिष्ट्यांसह लाँच

गुरूग्राम- सॅमसंगचे नुकतेच लाँच करण्‍यात आलेल्‍या गॅलेक्‍सी ए57 ५जी आणि गॅलेक्‍सी ए37 ५जी या डिवाईसेसनी नवीन वैशिष्‍ट्यांसह एआय अनुभव अधिक उत्‍साहित केला आहे. या नवीन वैशिष्‍ट्यांनी आवाज व भाषांतर क्षमतांमध्‍ये वाढ केली आहे. इतर अपग्रेड्समध्‍ये मल्‍टी-असिस्‍टण्‍ट परिसंस्‍था व प्रगत फोटोग्राफी वैशिष्‍ट्यांचा समावेश आहे, तसेच गती, सुरक्षितता व कार्यक्षमतेसाठी डिवाईसवरील प्रोसेसिंग प्रक्रियेला प्राधान्‍य देण्‍यात आले आहे.

गॅलेक्‍सी ए57 ५जी व ए37 ५जीमधील नाविन्‍यतांमध्‍ये अग्रस्‍थानी आहे डायरेक्‍ट वॉईसमेल, जे कॉलर्सना उत्तर न दिल्‍यास १०० टक्‍के अचूकतेसह संदेश पाठवण्‍याची सुविधा देते, ज्‍यामुळे वापरकर्ते कॉलरच्‍या आवाजामध्‍ये संदेश ऐकू शकतात. हे संदेश एआयद्वारे ट्रान्‍स्‍क्राइब केले जातात आणि नेटवर्क ऑपरेटर्सवर अवलंबून न राहता डिवाईसमध्‍ये सुरक्षितपणे स्‍टोअर राहतात.

तसेच, भारतात इंग्रजी, हिंदी व गुजराती भाषांमध्‍ये उपलब्‍ध असलेले एन्‍हान्‍स ट्रान्‍सलेशन व ट्रान्स्क्रिप्‍शन वैशिष्‍ट्य वॉईस मेसेजेसना मजकूरामध्‍ये बदलते आणि भाषांतर करते, ज्‍यामुळे वापरकर्ते त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या भाषेमध्‍ये संदेश वाचू शकतात.

वाहतूक, विमानतळ, मार्केटप्‍लेस किंवा मेट्रो अशा गोंगाटाच्‍या ठिकाणी कॉल कॅप्‍शन्‍स एकाच वेळी वाचन व ऐकण्‍यासाठी रिअल-टाइम ट्रान्स्क्रिप्‍शन देते, तर वॉईस फोकस गोंगाटामध्‍ये आसपासचा आवाज कमी करत कॉल्‍सदरम्‍यान स्‍पष्‍टपणे ऐकू येण्‍याची खात्री देते.

सॅमसंगच्‍या एआयचे लोकशाहीकरण करण्‍याप्रती कटिबद्धतेशी बांधील राहत गॅलेक्‍सी ए57 ५जी व ए37 ५जी मध्‍ये स्‍मार्टफोन अनुभवाच्‍या विविध पैलूंमधील ऑसम इंटेलिजन्‍स आहे. यामध्‍ये महत्त्वाचे म्‍हणजे मल्‍टी-असिस्‍टण्‍ट परिसंस्‍था, जेथे वन यूआय ८.५ अंतर्गत बिक्‍स्‍बी, जेमिनी व परप्‍लेक्सिटीचा समावेश आहे, ज्‍यामुळे वापरकर्ते त्‍यांच्‍या टास्‍क्‍ससाठी सर्वोत्तम असिस्‍टण्‍टची निवड करू शकतात. यामुळे वापरकर्त्‍यांना पाहिजे असलेल्‍या एआयचा वापर करण्‍याचा पर्याय मिळतो आणि माहितीचा शोध, कन्‍टेन्‍टचा सारांश व डिवाईस नियंत्रणासाठी एकाच यंत्रणेवरील अवलंबन दूर होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

“रोटरी हेरिटेजचे समाजाभिमुख कार्य प्रेरणादायी व आदर्शवत” – महापौर सौ रूपाराणी निकम

“रोटरी हेरिटेजचे समाजाभिमुख कार्य प्रेरणादायी व आदर्शवत” – महापौर सौ रूपाराणी न…