no images were found
मंत्रिमंडळ विस्तारानंतर आज शिंदे सरकारची पहिली कॅबिनेट बैठक
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी पार पडला असून, शिंदे आणि फडणवीस यांच्या पक्षातील प्रत्येकी 9-9 आमदारांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची पहिली कॅबिनेट बैठक पार होणार आहे. खातेवाटप आणि राज्यात सध्या सर्वत्र पावसाने हाहाकार माजवला असून, अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आजच्या कॅबिनेट बैठकीत पूरग्रस्तांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यावर 39 दिवसांनंतर शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. यात शिंदे गटातील आणि भाजपातील प्रत्येकी 9-9 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर आज शिंदे सरकारची पहिली कॅबिनेट बैठक पार पडणार आहे. त्यात आज कोणाला कोणते खाते मिळणार यावर देखील चर्चा होणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास तर फडणवीस यांच्याकडे अर्थ आणि गृह खाते जाण्याची शक्यता आहे.