no images were found
स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांना सन्मान स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व शाल देऊन गौरव
कोल्हापूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व क्रांती दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्यावतीने शहरातील 47 स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांच्या घरी जाऊन कृतज्ञता भेट देण्यात आली. यावेळी त्यांच्या घरी वरिष्ठ अधिका-यांनी भेट देऊन स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल व रोप देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात स्वातंत्र लढयाच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वतंत्र संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे. याचबरोबर स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची ज्वाजल भावना कायमस्वरुपती जनमानसात राहावी. या उद्देशाने स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेले स्वातंत्र्य सैनिक तसेच कारावास भोगाव्या लागलेल्या शहरातील 47 स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांच्या घरी जाऊन कृतज्ञता भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. महापालिकेच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त दहा दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या अधिका-यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या घरी जाऊन भेट दिली.