
no images were found
कच्च्या तेलाच्या किमतीत घट : इराण आण्विक करार सुरू करण्याच्या चर्चेचा परिणाम
मुंबई : कच्च्या तेलाच्या किमतीत मंगळवारी प्रति बॅरल एक डॉलरपेक्षा जास्त घसरण झाली. गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाचे दर अनेक महिन्यांतील निचांकी पातळीवर पोहोचले. २०१५ मधील इराण आण्विक करार पुन्हा सुरू करण्याच्या चर्चेतील नवीन प्रगतीमुळे ही घसरण झाली आहे. हा करार पुन्हा सादर करण्यासाठी युरोपियन संघाने अंतिम मसुदा तयार केला आहे. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित पक्षांकडून आक्षेप नसल्यास हा करार पूर्ववत केला जाईल. या कराराच्या पुनर्स्थापनेमुळे इराण आपल्या कच्च्या तेलाची मुक्तपणे निर्यात करू शकणार आहे. असे झाल्यास कच्च्या तेलाच्या किमती आणखी खाली येऊ शकतात, ज्याचा थेट परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर होईल.