
no images were found
केंद्रीय निवडणूक आयोग निर्णयाअभावी शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला?
मुंबई : शिंदे गटाचा जोपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय देत नाही तोपर्यंत मंत्रीमंडळ विस्तार होणार नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाचा केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी विस्तार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे जोपर्यंत शिंदे गटासंदर्भात निवडणूक आयोग निर्णय देत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, अशी माहिती सूत्रांना मिळाली. मंत्रिमंडळ लांबल्याने भावी मंत्र्यांची धाकधूक वाढली आहे.
राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून हे सरकार कोसळणार, असे वक्तव्य विरोधकांकडून सातत्याने केले जात आहेत. तर शिंदे गटातील आमदार पुन्हा ठाकरे गटात जाणार, मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही तर आमदार, खासदार फुटणार अशा बातम्या सातत्याने येत आहेत. मात्र, जोपर्यंत निवडणूक आयोगाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत केंद्रात आणि राज्यात मंत्रिमंडळ विस्तार न करण्याचा विचार भाजपने केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवसेना कोणाची याचा फैसला निवडणूक आयोग लवकरच देणार आहे. त्यानंतर दोनही गटाच्या आमदारांना पक्षांतर बंदी कायदा लागू होईल. त्यामुळं आमदारांचा या गटातून त्या गटात जाण्याचा मार्ग बंद होईल. शिंदे यांनी आमदारांना गटात घेताना मंत्रिपदाचं आश्वासन दिलं आहे. मात्र, हे आश्वासन ते पूर्ण करू शकले नाही. त्यामुळं आज ना उद्या मंत्रीमंडळ विस्तार होईल आणि आपल्याला मंत्रिमंडळात स्थान मिळेल. या आशेवर आमदार खासदार आहेत.शिंदे गटातील काही आमदार अधून मधून आपली नाराजी बोलवून दाखवतात.