
no images were found
भारत जोडो यात्रा दाखल होवून २ दिवसच झाले असताना जम्मूच्या नरवालमध्ये २ स्फोट:६ लोक जखमी
जम्मू : येथील नरवालमध्ये शनिवारी दोन स्फोट झाले. यामध्ये ६ जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटामागील कारण शोधण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे. जम्मूमध्ये भारत जोडो यात्रेच्या प्रवेशानंतर दोन दिवसांनी हे धमाके झाले. मात्र, स्फोटाचे ठिकाण यात्रेपासून ५८ किमी दूर अंतरावर आहे.
नरवालच्या ट्रान्सपोर्ट नगर, यार्ड क्रमांक ७ आणि ९ मध्ये पार्क केलेल्या वाहनांमध्ये दोन स्फोट झाले. माहिती मिळताच एसएसपीसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. प्रजासत्ताक दिन आणि भारत जोडो यात्रेनिमित्त जम्मूमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. यानंतर पोलिस पूर्वीपेक्षा अधिक सतर्क झाले आहेत. पोलिसांनी परिसराची नाकाबंदी केली असून वाहनांची तपासणी केली जात आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सुरक्षा यंत्रणांनी अलर्ट जारी केला होता. यामध्ये राहुल यांना भारत जोडो यात्रेत न जाण्याचा सल्ला देण्यात आला होता, कारण ही यात्रा खोऱ्यातील अशा काही मार्गांवरून जात आहे, जो भाग अत्यंत संवेदनशील मानला जातो. राहुल गांधी यांच्या सुरक्षेची जबाबदारी काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफकडे देण्यात आली आहे.