Home सामाजिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिनी शासकीय रूग्णालयात जन्मलेल्या कोल्हापूर जिल्हयातील मुलींना खासदार महाडिक यांच्या वतीने सोन्याची अंगठी प्रदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिनी शासकीय रूग्णालयात जन्मलेल्या कोल्हापूर जिल्हयातील मुलींना खासदार महाडिक यांच्या वतीने सोन्याची अंगठी प्रदान

2 second read
0
0
47

no images were found

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिनी शासकीय रूग्णालयात जन्मलेल्या कोल्हापूर जिल्हयातील मुलींना खासदार महाडिक यांच्या वतीने सोन्याची अंगठी प्रदान

 

कोल्हापूर (प्रतिनिधी):पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासकीय रूग्णालयात १६ सप्टेंबरला रात्री १२ नंतर ते १७ सप्टेंबर रात्री १२ वाजेपर्यंत जन्मलेल्या मुलींना खासदार धनंजय महाडिक यांनी सोन्याची अंगठी देण्याचा राबवलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे, असे उद्गार सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काढले. मोदी यांच्या वाढदिनी सीपीआरमध्ये जन्मलेल्या ९ मुलींना सोन्याची अंगठी प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. सीपीआरसह कोल्हापूर जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एकूण ४२ मुलींना सोन्याची अंगठी देण्यात आली.

स्वस्थ नारी-सशक्त परिवार अभियांतर्गत नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसादिवशी जन्मलेल्या मुलींचा सन्मान करण्याचा उपक्रम खासदार धनंजय महाडिक यांनी राबवला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत सीपीआरमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा उपक्रम राबवत असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. जिल्हयातील सर्व शासकीय रूग्णालयात १६ सप्टेंबर रात्री १२ नंतर ते १७ सप्टेंबर रात्री १२ वाजेपर्यंत जन्मलेल्या बालिकांना सोन्याची अंगठी देण्याचा उपक्रम राबवल्याचे  खासदार महाडिक यांनी सांगितले. तसेच या मुलींचा वाढदिवस संस्मरणीय व्हावा, यासाठी पंतप्रधान मोदींच्या वाढदिनी जन्मलेल्या मुलींच्या पालकांना चंदनाची दोन रोपे दिली जाणार आहेत. या रोपांचे १८ वर्षानंतर ५० लाख रुपये मिळतील आणि त्यातून तिच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च पार पडेल, असे खासदार महाडिक यांनी सांगितले. खासदार महाडिक यांनी राबवलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे उद्गार सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काढले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रभारी अधिष्ठाता डॉ. अनिता सैबन्नावर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, डॉ. गिरीष कांबळे, भाजप प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, समाजसेवा अधिक्षक शशिकांत रावळ उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…