
no images were found
बाजारपेठेतील रस्ता खचून वाहनांसह भाजीलाही जमिनीत
हैदराबाद : गोशामहल (हैदराबाद) परिसरात शुक्रवारी रस्ता खचून अपघात घडला. ज्या ठिकाणी रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे तेथे बाजार भरलेला होता तर बाजारात यावेळी प्रचंड गर्दीही होती. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाले नसली तरीही तेथे रस्त्यावर उभी असलेले वाहने, हातगाड्या रस्ता खचल्याने खड्ड्यात पडल्या. यासोबतच रस्त्यावर विक्रीसाठी ठेवलेला भाजीपाल्याची पोतीही यामध्ये कोसळली.
रस्ता जमिनीत खचताच त्यामध्ये रस्त्यावरील वाहने, हातगाड्या तसेच बाजारातील भाजीपाल्याची पोतीही रस्त्याच्या आतील भागात पडून तेथे अडकल्याचे व्हिडीओमध्ये दिसते आहे. या सर्व दुर्घटनेत एकजण किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. भाजी विक्रेत्यांचे, वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे.
अपघाताच्या वेळी याठिकाणी बाजारही भरलेला होता. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी होती. अपघातानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नसलं तरी त्याठिकाणी उभा असलेली अनेक वाहनं आणि हातगाड्या रस्त्यासोबतच खड्ड्यात कोसळल्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि जीएचएमसीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला.