
no images were found
राज्यपाल कोश्यारींना अमरावतीत जोडे दाखवण्याचा प्रयत्न
अमरावती : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे कोश्यारी यांच्या यांच्याविरोधात आंदोलने होतायत. आज अमरावती येथे कोश्यारी यांना जोडे दाखविण्याचा प्रयत्न ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून करण्यात आला. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांचा प्रयत्न हाणून पाडला.
अमरावती येथे राज्यपाल कोश्यारी आले असता ठाकरे गटाकडून राज्यपालांना जोडे दाखविण्याचा प्रयत्न झाला. तसेच कार्यकर्त्यांनी राज्यपाल विरोधी घोषणा दिल्या. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल आज अमरावती दौऱ्यावर आहेत. सीमालगतच्या गावांमधील समस्यांच्या पार्श्वभूमीवर हे दौरे आहेत. मात्र त्याआधीच अमरावतीत निषेध आंदोलन सुरू झाले. राज्यपालांच्या बैठकीच्या काही अंतरावर आंदोलन झाले.