Home क्राईम पुण्यात पुन्हा कोयता गॅंगच्या अल्पवयीन गुंडांचा हैदोस, नागरिकात भीतीचे वातावरण

पुण्यात पुन्हा कोयता गॅंगच्या अल्पवयीन गुंडांचा हैदोस, नागरिकात भीतीचे वातावरण

0 second read
0
0
111

no images were found

पुण्यात पुन्हा कोयता गॅंगच्या अल्पवयीन गुंडांचा हैदोस, नागरिकात भीतीचे वातावरण

पुणे : कोयता गॅंगवर पोलीसांनी कठोर कारवाई करण्यास सुरूवात केली असली तरी आणखी एक टोळीचा हातात कोयता घेऊन हैदोस सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. कोयता हातात घेऊन दहशत निर्माण करण्याचा ट्रेंडच पुण्यात सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुणे पोलीसांनी कठोर भूमिका घेऊन पुणेकरांना भयमुक्त वातावरण निर्माण करून द्यावे अशी मागणी आता पुणेकरांमध्ये होऊ लागली आहे.
पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने हातात कोयता घेऊन मध्यरात्री धिंगाणा घातला आहे, यामध्ये ठिकठिकाणी दमदाटी करून दुकाने बंद पाडली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात एकीकडे पोलीस कारवाई करत असतांना दुसरींकडे नवनवीन कोयता गॅंग निर्माण होत असून त्याबाबतच्या घटना समोर येत आहे, त्यामुळे कोयता गॅंगचे पेव पुण्यातून काही केल्या कमी होत नाहीये. गुरुवारी रात्रीच्या वेळी तरुणांच्या एक टोळक्याने गाड्यांचीही तोडफोड केली आहे, कोयते तलवारी गेऊं दुकानं बंद पडली आहे, नागरिकांच्या तक्रारीनंतर मार्केट यार्ड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला

एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला विशाखाप…