
no images were found
सत्तांतरानंतर प्रथमच संयुक्त बैठक- भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनेची महत्त्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर आज भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनेची महत्त्वाची बैठक होणार आहे. सत्तांतरानंतर पहिल्यांदाच संयुक्त बैठक होत असून, अंतर्गत कुरुबुरींना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न आहे. या बैठकीला शिंदे गट, भाजपचे सर्व आमदार आणि खासदार ऑनलाईन पद्धतीन उपस्थिती लावणार आहेत.
भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांची महत्वाची बैठक होत असल्याने या बैठकीत काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या प्रोग्राममध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करण्यासंदर्भात युतीतील नेते आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याचवेळी विधान परिषद निवडणूक याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठ्कीस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही ऑनलाईन उपस्थित राहून आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच भाजप आणि शिंदे गटाचे काही वरीष्ठ नेते मंत्री सहभागी होणार आहेत.