Home राजकीय राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी प्रमुख सहा मागण्यासाठी परीक्षेवर बहिष्कार टाकणार

राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी प्रमुख सहा मागण्यासाठी परीक्षेवर बहिष्कार टाकणार

0 second read
0
0
98

no images were found

राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी प्रमुख सहा मागण्यासाठी परीक्षेवर बहिष्कार टाकणार
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी आपल्या प्रमुख सहा मागण्यासाठी २ फेब्रुवारीपासून सर्व बोर्ड आणि विद्यापीठाच्या परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार आंदोलन करणार आहेत.सेवाअंतर्गत सुधारित आश्वासीत प्रगती योजनेचा रद्द केलेले शासन निर्णय पुनर्जिवित करुन पूर्ववत लागू करा. सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार वर्षानंतरच्या लाभाची योजना विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करा. यासह विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. या साठी कृती समितीने आंदोलनाचे टप्पे ठरवले असून त्यानुसार सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या आंदोलनाचा पहिला भाग म्हणजे २ फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालय आणि विद्यापीठातील जवळपास ३० हजार शिक्षेकतर कर्मचारी हे २ फेब्रुवारीपासून परीक्षेच्या कामावर बहिष्कार टाकणार आहेत. १५ फेब्रुवारी रोजी काळ्या फिती लावून कार्यालयीन काम करणार आहेत. १६ फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप तर २० फेब्रुवारीपासून सर्व अकृषी विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालये बेमुदत बंद करण्याचा निर्णय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…