no images were found
कोल्हापुरातील खून प्रकरणी चौघांना अटक; पूर्व वैमनस्यातून केला खून
कोल्हापूर : पाचगाव रोडवर महापालिका हद्दीत जगतापनगर येथे गुरुवारी मध्यरात्री झालेल्या तरुणाच्या खून प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि करवीर पोलिसांनी शुक्रवारी पहाटे मुख्य संशितासह चौघांना ताब्यात घेतले आहे.
आर्थिक आणि पूर्व वैमनस्यातून ऋषिकेश महादेव सूर्यवंशी (वय २५, रा. शिंगणापूर) याचा खून केल्याची कबुली मारेकऱ्यांनी दिली. एलसीबी आणि करवीर पोलिसांचे रात्रभर छापासत्र सुरु होते त्याला यश आले असून या खुनाच्या कटाचा सूत्रधार गणेश येलगट्टी, अथर्व हावल, वृषभ साळोखे सोहम शेळके हे चौघेही मारेकरी पोलिसांच्या हाती लागले.
या प्रकरणी मुख्य संशयित गणेश येलगट्टी आणि ऋषिकेश यांच्यात आर्थिक कारणातून पूर्व वैमनस्य निर्माण झाले होते. त्यांच्यात यापूर्वी वादावादी आणि हाणामारीच्या घटना घडल्या होत्या. ऋषिकेश गणेश आणि वृषभला खुन्नस देत होता. त्यामुळे मारेकरांनी ऋषिकेश काटा काढण्याचा बेत रचला दारू पिण्याच्या आमिषाने ऋषिकेशला जगतापनगर येथील मैदानावर बोलवले. ऋषिकेशला दारू पाजल्यानंतर चव्हाण त्याच्यावर एकाचवेळी हल्ला केला. आठ वेळा त्याचे दगडाने डोके ठेचले. चौकशीमध्ये मारेकरी वृषभ याने रक्ताच्या थारोळ्यात तडफडणाऱ्या ऋषिकेशचे डोके मोठ्या दगडाने आठवेळा ठेचल्याची माहिती उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि करवीर पोलिसांनी शुक्रवारी पहाटे मुख्य संशितासह चौघांना ताब्यात घेतले आहे.