no images were found
सोलापुरमध्ये आयकर विभागाची मोठी कारवाई; 50 कोटी रुपयांची तफावत
सोलापूर : सोलापूरमध्ये आयकर विभागाने विविध व्यावसायिकांच्या घर तसेच कार्यालयांवर छापे टाकले. ही छापेमारी त्यांनी ३ दिवस केली. आयकर विभागाने बीफ कंपनी, बांधकाम साहित्य, भंगार विक्रेते, स्टील विक्रेत्यांवर याच्यावर ही कारवाई केली असून यातून जवळ जवळ ५० कोटी रुपयांची तफावत आढळली आहे.
आयकर विभागाकडून २ महिन्यांपूर्वी शहरातील रुग्णालयांवर टाकण्यात आलेल्या छापेमारीत रुग्णालयांवर दंडात्मक कारवाई झाली होती. सोमवार ते गुरुवार असे चार दिवस आसरा चौक परिसर, हैदराबाद रोड, कुमठा नाका परिसरात बीफ, भंगार विक्री, बांधकामाचे साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर अर्य्क्र विभागाकडून छापेमारी झाली.
यातील विशेषतः भंगार विक्रेत्यांवर मोठ्याप्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. भंगार विक्रेत्यांच्या रोखीने झालेल्या व्यवहार आणि कागदोपत्री झालेल्या व्यवहारांमध्ये सुमारे 50 कोटी रुपयांची तफावत असल्याचे यावेळी आढळून आले आहे. भंगार विक्रेत्यांनी खरेदीची रक्कम कमी दाखवल्याचे देखील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे.