Home धार्मिक पंचमुखी गणेश मंदिराच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम

पंचमुखी गणेश मंदिराच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम

0 second read
0
0
227

no images were found

 पंचमुखी गणेश मंदिराच्यावतीने विविध
धार्मिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम

कोल्हापूर : शाहूपुरी, कुंभार गल्ली येथील श्री पंचमुखी गणेश सेवा भक्त मंडळाच्यावतीने येथील पंचमुखी गणेश मंदिरात गणेश जयंती निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम तसेच सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष सुनील पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

याबद्दल अधिक माहिती देताना ते म्हणाले, गणेश जयंती २५ जानेवारी रोजी आहे. गणेश जयंतीच्या सप्ताहाची सुरुवात २० तारखेपासून होणार आहे. २० ते २६ जानेवारी पर्यंत भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १९९५ साली स्थापन केलेल्या पंचमुखी गणेश मंदिरास यावर्षी २८ वर्षे पूर्ण होत आहेत. दर वर्षी परंपरागत जन्मकाळ सोहळा या मंदिरामध्ये साजरा केला जातो. यामध्ये महाआरती, सामुदायिक अथर्वशीर्ष पठण, पारायण, भजन, श्रीगणेशाचा अभिषेक, जन्मकाळ व पालखी सोहळा असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.२६ जानेवारी रोजी महाप्रसाद वाटप होणार आहे .श्री गणेशाच्या जन्मसोहळ्याबरोबरच आपणही समाजाचे देणे लागतो ही सामाजिक बांधिलकी जपत मंडळाच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यावर्षीही रक्तदान शिबिर, फुले, हार, हराटी अशा निर्माल्यापासून खत निर्मिती करणे, धार्मिक ग्रंथालय व वाचनालय उभा करणे, बायोगॅसपासून सहयंत्र बनवणे, व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करणे, शाहूपुरी भागात येणाऱ्या पुरापासून संरक्षणासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारणे, गरजूंसाठी प्राथमिक उपचार केंद्राची उभारणी, मंदिर फाउंडेशनच्यावतीने ऍम्ब्युलन्स सेवा, दंतचिकित्सा केंद्र सुरू करणे असे नियोजित उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

गेली अनेक वर्षे मंदिराच्यावतीने अंध,अपंग,वृद्ध यांच्या सामाजिक संस्थांना एक वेळ भोजन किंवा भोजनाचे साहित्य प्रदान केले आहे. भोगावती परिते येथील मुलांच्या वसतीगृहास पाणी तापवण्याचा बंब भेट दिला आहे. काटेभोगाव येथील गोशाळेत महिन्याभराचा चारा वाटप, सानेगुरुजी येथील कोविड सेंटरला कोरोना उपचार साहित्याचे वाटप केले आहे. मंदिराचा स्वतःचा सांस्कृतिक हॉल आहे. त्या हॉलमध्ये भागातील मुलांसाठी मोफत बाल संस्कार वर्ग तसेच तलवारबाजी लाठीकाठी, कराटे, योगाचे प्रशिक्षण दिले जाते.

पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष उदय कुंभार, उत्सव कमिटी अध्यक्ष शुभम कुंभार,उपाध्यक्ष ओंकार पाटील, सचिव अरविंद जाधव, खजनिस शिवाजी बावडेकर, सतिश वडणगेकर, राजेश पठाण, उदय डवरी, अजय पाटील, सतिश कुंभार उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…