Home शैक्षणिक  डिजिटल लर्निंगच्‍या माध्‍यमातून महाराष्‍ट्रातील १२ जिल्‍ह्यांमधील वंचित मुलांना शिक्षित करणार  

 डिजिटल लर्निंगच्‍या माध्‍यमातून महाराष्‍ट्रातील १२ जिल्‍ह्यांमधील वंचित मुलांना शिक्षित करणार  

3 min read
0
0
265

no images were found

 

 डिजिटल लर्निंगच्‍या माध्‍यमातून महाराष्‍ट्रातील १२ जिल्‍ह्यांमधील वंचित मुलांना शिक्षित करणार  

ग्‍लोबल थॉट फाऊंडेशनसोबतच्‍या सहयोगाचा महाराष्‍ट्रातीलतसेच पश्चिम दिल्‍लीच्‍या काही भागांमधील वंचित सामाजिक-आर्थिक पार्श्‍वभूमीतील १०,००० हून अधिक मुलांना लाभ देण्‍याचा मनसुबा 

महाराष्‍ट्र१८ जानेवारी २०२३: – बायजूज एज्‍युकेशन फॉर ऑल’ उपक्रमाने वंचित पार्श्‍वभूमीमधील मुलांना दर्जेदार शिक्षण व डिजिटल लर्निंग संधींसह शिक्षित व सक्षम करण्‍यासाठी मुंबईमधील एनजीओ ग्‍लोबल थॉट फाऊंडेशनसोबत सहयोग केला आहे. या सहयोगाचा भाग म्‍हणून बायजूज एज्‍युकेशन फॉर ऑल मुंबईतील महापालिका शाळांमधीलनागपूरलातूरबुलढाणारत्‍नागिरीकोल्‍हापूरसांगली यासह महाराष्‍ट्रातील १२ जिल्‍ह्यांमधील आश्रम शाळांमधील (आदिवासींसाठी शाळा) आणि पश्चिम दिल्‍लीतील काही शाळांमधील वंचित विद्यार्थ्‍यांना मोफत प्रिमिअम कन्‍टेन्‍ट उपलब्‍ध करून देईललाभार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील निवडक आठ जिल्ह्यांतील पोलिस कर्मचाऱ्यांच्या वॉर्डचा देखील समावेश आहे.

या सहयोगासह बायजूज एज्‍युकेशन फॉर ऑल आणि ग्‍लोबल थॉट फाऊंडेशन सामाजिकदृष्‍ट्या वंचित व आर्थिकदृष्‍ट्या गरीब पार्श्‍वभूमींमधील विद्यार्थ्‍यांनाविशेषत: मुलींना मोफत अध्‍ययन उपक्रम सादर करत त्‍यांच्‍यासाठी दर्जेदार शिक्षण मिळण्‍यासंदर्भातील आव्‍हानांचे निराकरण करेल. इयत्ता ४थी ते १२वी मधील या विद्यार्थ्‍यांना बायजूज लर्निंग अॅपवर प्रिमिअम कन्‍टेन्‍ट उपलब्‍ध होईल. हा अॅप प्रत्येक मुलाच्‍या अध्‍ययन गरजांची पूर्तता करण्‍यासाठी सानुकूल व डिजिटली-सक्षम आहे. हा सहयोग २०२५ पर्यंत भारतभरातील १० दशलक्ष वंचित मुलांना सक्षम करण्‍याचा बायजूजचा दृष्‍टीकोन संपादित करण्‍याप्रती प्रयत्‍न आहे. 

या सहयोगाबाबत बोलताना बायजूजच्‍या सोशल इनिशिएटिव्‍ह्जच्‍या उपाध्‍यक्ष मानसी कसलीवाल म्‍हणाल्‍या, ‘‘बायजूजमध्‍ये आमचा सर्वांसाठी दर्जेदार शिक्षण उपलब्‍ध करून देत समाजाच्‍या विविध स्‍तरांमधील मुलांच्‍या उन्‍नतीसाठी परिवर्तनात्‍मक सामाजिक उपक्रमांच्‍या माध्‍यमातून शैक्षणिक स्‍तरामध्‍ये परिवर्तन घडवून आणण्‍याचा प्रयत्‍न आहे. आम्‍हाला ग्‍लोबल थॉट फाऊंडेशनसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. ग्‍लोबल थॉट फाऊंडेशनचा शिक्षण क्षेत्रात सकारात्‍मक परिवर्तन घडवून आणण्‍यावर विश्‍वास असण्‍यासोबत भारतातील ग्रामीण व शहरी गरीब प्रांतांमधील महिला सक्षमीकरणाप्रती काम देखील करते. या सहयोगाच्‍या माध्‍यमातून आम्‍हाला पोलिस कर्मचाऱ्यांच्‍या वॉर्डसना मदत करण्‍यामध्‍ये सक्षम होण्‍याने आणि एकसंधी दर्जेदार शिक्षणाच्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍या मुलांना सक्षम करण्‍याची खात्री घेण्‍याने सन्‍माननीय वाटते. त्‍यांच्‍यासोबतचा आमचा सहयोग आमच्‍या एकूण लाभार्थ्‍यांपैकी ५० टक्‍के लाभार्थी असलेल्‍या मुलींच्‍या सर्वांगीण विकासावर दीर्घकालीन परिणाम घडवून आणण्‍याच्‍या दिशेने लक्षणीय पाऊल आहे.’’ 

‘‘ग्‍लोबल थॉट फाऊंडेशनमध्‍ये आम्‍ही भारतातील ग्रामीण व शहरी गरीब प्रांतांमध्‍ये समान अध्‍ययन संधी उपलब्‍ध होण्‍यासंदर्भातील अभावाचे निराकरण करण्‍यावर प्रमुख लक्ष केंद्रित करतो. आम्‍हाला आनंद होत आहे की, बायजूज सोबतच्‍या आमच्‍या सहयोगाच्‍या माध्‍यमातून आम्‍ही सर्वांसाठी शिक्षण उपलब्‍ध करून देण्‍यामध्‍ये यशस्‍वी ठरलो आहोततसेच आम्‍ही गर्ल चाइल्‍ड एज्‍युकेशनला चालना देण्‍यावर लक्ष केंद्रित देखील केले आहे. बायजूज एज्‍युकेशन फॉर ऑल सारख्‍या समविचारी सहयोगींसह आम्‍हाला देशाच्‍या ग्रामीण प्रांतांवर दीर्घकालीन परिणाम घडवून आणण्‍याचा आणि अधिकाधिक मुलांना शिक्षित करण्‍यामध्‍ये मदत करण्‍याचा विश्‍वास आहे,’’ असे ग्‍लोबल थॉट फाऊंडेशनच्‍या विश्‍वस्‍त श्रीम. विजया ताई मानकोस्‍कर म्‍हणाल्‍या. 

 
 
 
 
 
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…