Home क्राईम पुण्यात कोयता गँगच्या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी

पुण्यात कोयता गँगच्या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी

0 second read
0
0
151

no images were found

पुण्यात कोयता गँगच्या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी

पुणे : पुण्यात कोयत्याने केलेल्या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यात कोयता गँगचे हल्ला सत्र सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगची दहशत सुरू आहे. पोलिसांनी कारवाई करूनही त्यांचे वारंवार हल्ले सुरूच आहेत.
गंभीर जखमी, फिर्यादी सतीश काळे यांचे काही तरुणांसोबत चार महिन्यापूर्वी किरकोळ कारणातून बाचाबाची झाली होती. या भांडणाचा राग मनात धरत चौघांनी काल रात्री हल्ला केला आहे. दाद्या बगाडे ,दिपू शर्मा, तुषार काकडे आणि मोन्या कुचेकर या चौघांविरोधात शिवाजीनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी सतीश भीमा काळे हे आपल्या पत्नी आणि मुलाबाळासह शिवाजीनगर भागात असलेल्या एका मैदानावर रात्री झोपले असताना टोळक्याने हातात कोयते घेऊन त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यानंतर परिसरात दहशत माजवत कोयता टोळीने हल्ला केला. पोलिस अधिक तपास करत आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …