
no images were found
केरळमध्ये मासिक पाळीदरम्यान महाविद्यालयीन विद्यार्थिनींना मिळणार रजा
कोचीन : केरळ राज्याच्या अखत्यारित येणाऱ्या विद्यापीठांत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मासिक पाळीची रजा मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे.कोचीन विद्यापीठाने यापूर्वी आपल्या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मासिक पाळीची रजा देण्याचा निर्णय घेतला होता. विद्यार्थिनींना मासिक पाळीत आराम मिळावा म्हणून या हेतूने हा निर्णय घेण्यात आला होता.
विद्यार्थिनींना दोन टक्के अतिरिक्त सूट देण्यास मान्यता दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर केरळच्या उच्च शिक्षण मंत्री आर. बिंदू यांनी राज्य सरकारच्या विद्यापीठांतील विद्यार्थिनींना मासिक पाळीची रजा देण्याचा निर्णय घेतला आहे.
मासिक पाळीच्या काळात विद्यार्थिनींना होणारा मानसिक आणि शारिरीक त्रास हा असाह्य असतो. त्यामुळं सर्व विद्यापिठात मासिक पाळीच्या काळात विद्यार्थिनींना सुट्टी मिळावी यासाठी योग्य ती पावलं उचलली जातील, असं उच्चशिक्षण मंत्री आर.बिंदू यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहलं आहे.
तसंच, केरळ असं पहिलं राज्य असेल जिथे मासिक पाळी काळात विद्यार्थिनींना सुट्टी देण्यात येतेय. दरम्यान, कोचीन विद्यापिठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मासिक पाळीची रजा मिळावी यासाठी स्टुडंट-फेडरेशन ऑफ इंडियाच्या विद्यार्थि संघनेने मागणी केली होती. त्यानंतर ११ जानेवारीला विद्यार्थिनीच्या प्रत्येक सत्रातील अनुपस्थित आणखी दोन टक्क्यांची सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.