Home राजकीय नाशिक मतदारसंघात ६ जणांची माघार, सत्यजित तांबे यांच्यासह १६उमेदवार रिंगणात

नाशिक मतदारसंघात ६ जणांची माघार, सत्यजित तांबे यांच्यासह १६उमेदवार रिंगणात

0 second read
0
0
129

no images were found

नाशिक मतदारसंघात ६ जणांची माघार, सत्यजित तांबे यांच्यासह १६उमेदवार रिंगणात

नाशिक : विधान परिषदेच्या पदवीधर नाशिक मतदारसंघाच्या निवडणुकीत आज माघारीच्या दिवशी सहा उमेदवारांनी माघारी घेतल्यानंतर रिंगणात अपक्ष सत्यजित तांबे यांच्यासह १६ उमेदवार रिंगणात आहेत. भारतीय जनता पक्षाकडून एकही उमेदवार नसल्याने तांबे यांच्यासमोर फारसे मोठे आव्हान नसल्याचे दिसून येत आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला असला तरी तांबे यांचे तळागाळातील नेटवर्क, कामाचा अनुभव व संघटन कौशल्य यामुळे तांबे हे किती मतांनी निवडून येतात एवढीच उत्सुकता निवडणुकीत शिल्लक राहिली असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.
विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी जानेवारीअखेरीस मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणे व माघारीची प्रक्रिया पार पडली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल न करता सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला.
यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. सत्यजित यांनी अपक्ष व काँग्रेस असे दोन अर्ज दाखल केले होते. काँग्रेसने रविवारी डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसमधून निलंबित केल्याचे घोषित केले. त्या अनुषंगाने सत्यजित यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली.
माघारीच्या दिवशी आता १६ उमेदवार आता रिंगणात असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे यांनी दिली. डॉ. सुधीर सुरेश तांबे, अमोल बाळासाहेब खाडे, दादासाहेब पवार, धनंजय जाधव, राजेंद्र निकम, धनराज विसपुते या सहा उमेदवारांनी माघार घेतली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…