no images were found
न्यू कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थांचा अभ्यासदौरा संपन्न कोल्हापूर -येथील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग संचालित न्यु कॉलेज ऑफ फार्मसी च्या विद्यार्थांचा अभ्यासदौरा संपन्न झाला विद्यार्थ्यांनी अभ्यासदौऱ्यामध्ये आयुर्वेदातील प्रसिद्ध एस. जी. फायटोफार्मा या औषध निर्माण करणाऱ्या कंपनीला भेट दिली. तेथें विद्यार्थांना औषध निर्माण मधील विविध टप्पे, संशोधन, वेगवेगळे विभाग तेथें चालणारे काम, गुणवत्ता पूर्वक औषध निर्मिती यांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यानंतर शिवाजी विद्यापीठ येथील बोटिनिकल गार्डनला भेट देऊन दुर्मिळ वनस्पती, त्यांचे संगोपन,त्यांचे औषनिर्माणशास्त्र मधील महत्व यांची माहिती घेतली. शेवटच्या टप्प्यात संजीवनी ब्लड बँक येथे भेट देऊन रक्तातील विविध घटक, त्यावर केली जाणारी व प्रक्रिया तसेच रक्तदानाचे महत्व समजून घेतले. सदरच्या अभ्यासदौरा यशस्वी होण्यासाठी संस्थचे विकास अधिकारी डॉ संजय दाभोळे, प्राचार्य डॉ रवींद्र कुंभार, डॉ सचिन पिशविकर यांचे मार्गदर्शन लाभले. सदरचा अभ्यासदौरा यशस्वी होण्यासाठी प्रा. पियुषा नेजदार प्रा. सुजित साळोखे, सौ वर्षा शिंदे, सीमा साळोखे, व अर्जुन चौगुले यांनी विशेष परिश्रम घेतले.