
no images were found
कोल्हापुरच्या तरुणाईने समाजासमोर घालून दिला नवा आदर्श. कोल्हापूर (प्रतिनिधी): तरुणाई मोबाइल आणि व्यसनांच्या आहारी जाऊन बिगड़त असल्याचे सार्वत्रिक चित्र आहे.पण या समजाला छेद देत सद्याची तरुण पिढी समाजमन जपत विधायक वाटेवर चालत असल्याचा प्रत्यय आज विहा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने आणून दिला. पारंपरिक शिक्षणाबरोबर वंचित आणि उपेक्षित घटकांच्या मुलाना आधुनिक आणि ‘स्मार्ट’ शिक्षण मिळावे ,या उद्देशाने या संस्थेच्या स्वयंसेवकानी पदरमोड करत डॉ जाकिर हुसैन ऊर्दू-मराठी स्कूल या कोल्हापूर महापालिकेच्या प्रशालेला अत्याधुनिक स्मार्ट टीव्ही प्रदान करत या मुलाना
पाटी-पेन्सिल आणि वही पुस्तकासोबत आधुनिक तंत्र आणि स्मार्ट शिक्षणप्रणालीच्या सहाय्याने विद्यार्जन करता यावे ,यासाठी अत्याधुनिक स्मार्ट टीव्ही प्रदान करुन या मुलांची शैक्षणिक कारकीर्द उज्वल व्हावी ,यासाठी मोलाचे योगदान दिले. कुठेही जाहिरतबाजी न करता प्रसिद्धि वर भर न देता ही मोजकी मित्र मंडळी एकत्र आली. कुणी पाचशे ,,,कुणी हजार तर कुणी शंभर-दोनशे रुपये अशी वर्गणी काढून या तरुण मित्रानी उत्तम दर्जा असलेला अत्याधुनिक स्मार्ट टीव्ही खरेदी केला . कुठेही याचा गाजावाज़ा न करता कोल्हापूर महापालिकेच्या उपायुक्त सौ. शिल्पा दरेकर ,उपशहर अभियंता नारायण भोसले आणि कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा स्मार्ट टीव्ही डॉ जाकिर हूसेन ऊर्दू-मराठी स्कुलच्या विद्यार्थ्याना छोटेखानी सोहळा आयोजित करुन प्रदान करण्यात आला. आपण आता स्मार्ट टीव्हीच्या सहाय्याने शिक्षण घेणार या कल्पनेने मोहरुन गेलेल्या बच्चे कंपनीच्या आनंदाला पारावार राहिला नाही. विहा फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांत पोवार यानी संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम आयोजित केल्याची माहिती दिली. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका यास्मीन पेटकर, विहा फाउंडेशन चे उपाध्यक्ष मतीन बोदले,सचिव अजिंक्य पाटील, खजानीस रणजीत खराडे, जितेंद्र पुरोहित,रोहन जाधव, अजिंक्य पिसाळ, अमेय भालकर,अंबर बनगे,संजय तोलगी,अजहर मुल्ला,शक्ती कुरडे उपस्थित होते .