Home राजकीय बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कॉफीटेबल बुकचे श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते अनावरण

बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कॉफीटेबल बुकचे श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते अनावरण

2 second read
0
0
216

no images were found

बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कॉफीटेबल बुकचे श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते अनावरण

मुंबई  : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. यामध्ये गेली ७५ वर्षे मुंबईच्या विकासात हातभार लावणाऱ्या बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. एकीकडे बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशन अमृत महोत्सव वर्ष साजरे करत असताना, भारत देशही अमृत महोत्सव वर्ष साजरे करत आहे. यानिमित्ताने देशाला महासत्ता बनविण्याचा संकल्प पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीनी केला असून, त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरविण्यामध्ये  येणाऱ्या काळात बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशन महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा “मित्र” संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले. बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कॉफीटेबल बुकचे श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीस श्री.राजेश क्षीरसागर यांची महाराष्ट्र राज्याच्या “मित्र” संस्थेच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल बॉम्बे इंडस्ट्रीज असोसियेशनच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी गेल्या वर्षभराच्या कारकिर्दीत स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष श्री.नेव्हिल संघवी यांच्या कामाची स्तुती करत नूतन अध्यक्ष श्री.आशिष गांधी यांना पुढील वाटचालीस श्री.राजेश क्षीरसागर यांनी शुभेच्छा दिल्या.

यानंतर बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा “मित्र” संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त सर्व सभासदांना शुभेच्छा दिल्या. संपूर्ण पश्चिम भारतातील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्रातील सुमारे १३०० पेक्षा अधिक सभासद असणारी आणि अमृत महोत्सव वर्ष साजरा  करणारी अग्रगण्य संघटना असून, गेल्या अनेक वर्षा पासून रोजगार निर्मिती, आयात -निर्यात, अत्याधुनिक उत्पादने याद्वारे राज्यासह देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्याचे काम असोसिएशनने केले आहे. यासह आजच्या गरजा आणि तंत्रज्ञान विचारात घेवून या असोसिएशनने राबविलेले अनेक उपक्रम उल्लेखनीय आहेत. त्याचमुळे ही संघटना जागतिक स्पर्धेमध्ये आपला ठसा उमटवीत पाय रोवून उभी आहे, हे भावी युवा पिढीसाठी फायदेशीर आहे.

त्याचबरोबर बॉम्बे इंडस्ट्रीज असोसियेशनच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये कौशल्यांची मागणी पुरवठा यांच्यातील अंतर कमी करण्याच्या दृष्टीने या उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या विविध क्षेत्रात युवकांना प्रशिक्षित करण्यासाठी कौशल्य विकास केंद्र स्थापन करणे. यासह राज्यातील नवनवीन प्रकल्प आणि धोरणामध्ये बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनच्या प्रतिनिधीना विचार विनिमय करण्यासाठी समाविष्ट करण्यात यावे, या मागण्यांसदर्भात लवकरच मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री ना.मा.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्याची चर्चा करून बॉम्बे इंडस्ट्रीज असोसियेशनला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाहीही श्री.क्षीरसागर यांनी दिली.

यावेळी बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष श्री.नेव्हिल संघवी, नूतन अध्यक्ष आशिष गांधी, सेंट्रम ग्रुपचे चेअरमन श्री.जसपाल बिंद्रा, कोकुयो कॅमलिन लिमिटेडचे व्हॉइस चेअरमन श्री.श्रीराम दांडेकर, बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.राजेंद्र कोठारी, सचिन शहा, श्री.अमित कुमार आदी संचालक मंडळ, सभासद उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…