
no images were found
सत्ता संघर्षाची सुनावणी पाच न्यायमूर्तींच्या घटनापिठासमोरच
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आणि शिवसेनेतील ठाकरे शिंदे गटातील वाद यावर सर्वोच्च न्यायालयात गेले तीन दिवस सुरू असलेल्या सुनावणीनंतर हे प्रकरण ७ ऐवजी५ न्यायमूर्तींच्या घटनापिठासमोरच चालणार असल्याचा निर्णय महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याबरोबरच सत्ता संघर्षाबाबतच्या याचिका अरुणाचल प्रदेशच्या नबाम रेबिया प्रकरणाच्या निकालाच्या आधारावर चालवण्याबाबतचा निर्णय मात्र राखून ठेवला आहे.
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात १६ आमदारांची अपात्रता, नवीन विधानसभा अध्यक्षांची निवड, शिवसेना पक्ष कोणत्या गटाचा, शिवसेनेचे अधिकृत धनुष्यबाण चिन्ह कोणत्या गटाकडे याबाबतच्या याचिकांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राज्यातील सत्तेचा सारीपाट तसाच सुरू राहणार की नवीन मांडला जाणार हे अवलंबून आहे. या पार्श्वभूमीवर गेले तीन दिवस सुरू असलेल्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. आज यामध्ये झालेल्या निर्णयापैकी याचिकांची सुनावणी ५ ऐवजी ७ न्यायमूर्तींच्यासमोर सुरू ठेवण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे. तर नबाम रेबिया प्रकरणाच्या आधारावर खटला चालवण्याचा निर्णय राखून ठेवला असला तरी या याबाबतही उत्सुकता लागून राहिली आहे. आजच्या निर्णयावर या याचिकांचे निकाल लवकर लागण्याची चिन्हे निर्माण झाली असल्याचे तज्ञांची मत आहे.