
no images were found
पुण्याचं नाव जिजापूर असे करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी
जालना : औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर असं नामांतर झाल्यानंतर पुण्याच्या नामांतराच्या मागणीला जोर धरू लागला आहे. पुण्याचे जिजापूर करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत प्रस्ताव आल्यानंतर चर्चा करू, असं त्या म्हणाल्या.
पुणे शहराचं नाव बदलून जिजापूर करावं अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. यापूर्वीही संभाजी ब्रिगेडनं ही मागणी केली होती. आता यावर राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनीही जालना येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. याबाबतचा प्रस्ताव आल्यानंतर चर्चा करू, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. मकर संक्रांतीनिमित्त कुणाशी तुम्हाला गोड बोलायला आवडेल, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. त्यावर मी वर्षातील ३६५ दिवस गोडच बोलत असते, असं उत्तर त्यांनी दिलं.
संभाजी ब्रिगेडच्या मागणीनंतर पुण्याचे जिजापूर असे नाव होणार का? अशी चर्चा होऊ लागली आहे. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडनं ही मागणी केली आहे. यापूर्वीही संभाजी ब्रिगेडने अनेकदा ही मागणी केली आहे. राजमाता जिजाऊंनी पुन्हा पुणे वसवलं आणि पुणे हे शहर माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे प्रतीक आहे. त्यामुळे जिजापूर असे नाव करावे, अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.